Advertisement

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टीचं रिकार्पेटिंगचं काम पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी नुतनीकरण व दुरुस्तीचं काम निश्चित वेळेत पूर्ण करण व्यवस्थापनाला शक्य झालं आहे.

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टीचं रिकार्पेटिंगचं काम पूर्ण
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळं मुंबई विमानतळ व्यवस्थापनाला चांगलाचं फायदा झाला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी नुतनीकरण व दुरुस्तीचं काम निश्चित वेळेत पूर्ण करण व्यवस्थापनाला शक्य झालं आहे. दरम्यान विमानसेवा बंद असल्यानं मोठी तोटा सहन करावा लागतो आहे. 

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टीचं रिकार्पेटिंग करण्याचं काम वेळेत पूर्ण झालं आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक १४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं त्यानंतर सुरु होणारी विमानं विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर उतरु शकतील व तिथून उड्डाण करु शकतील.

मुंबई विमानतळावर २ धावपट्टी आहेत. दोन्ही धावपट्ट्या एकमेकांना छेद देणाऱ्या असल्याने एका वेळी एकाच धावपट्टीचा वापर केला जावू शकतो. एका धावपट्टीचा वापर होणाऱ्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये मुंबई विमानतळाचा समावेश होतो. २४ तासात सरासरी ९८० विमानांचं व्यवस्थापन केलं जातं. धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी ८३५ कर्मचारी कार्यरत होते.

धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामामध्ये ३ हजार ४४८ मीटर म्हणजे सुमारे ११ हजार ३०९ फूट भागाची दुरुस्ती करण्यात आली. या कामासाठी हॉट मिक्स ओव्हरलेईंग पध्दतीचा वापर करण्यात आला. यावेळी सर्व एरॉनॉटिकल ग्राऊंड लाईट सिस्टिम काढण्यात आली होती. विमान वाहतूक सुरळीत व सुरक्षित सुरु राहील याची सर्व काळजी घेऊन हे काम करण्यात आलं आहे.



हेही वाचाा -

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा