आक्सा समुद्रकिनारी पोलिसांसाठी बीट चौकी

 Malad West
आक्सा समुद्रकिनारी पोलिसांसाठी बीट चौकी

मालाड - मालाडचे स्थानिक आमदार असलम शेख यांच्या वतीने आक्सा समुद्रकिनारी पोलिसांसाठी बीट चौकी बांधण्यात आली आहे. शेख यांच्या आमदार निधीतून म्हाडा तर्फे या बीट चौकीचे बांधकाम करण्यात आलं. त्यामुळे या चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या चौकीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर चौकी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे आमदार असलम शेख यांनी सांगितले.

Loading Comments 

Related News from इन्फ्रा