Advertisement

मुंबईतील 8 पुलांच्या दुरुस्तीची कामं रखडली

लॉकडाऊन शिथिल होताच महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल यांसह 8 पुलांची कामे सुरु करण्यात आली होती.

मुंबईतील 8 पुलांच्या दुरुस्तीची कामं रखडली
SHARES

पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबईतील 8 पुलांच्या दुरूस्तीची कामं रखडली आहेत. पावसाळ्यात पुलांच्या दुरुस्तीची कामं करणं शक्य नाही. त्यामुळे 8 पुलांच्या दुरुस्तीचं काम ऑक्टोबरनंतरच हाती घेतली जाणार आहेत. 

लॉकडाऊन शिथिल होताच महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल यांसह 8 पुलांची कामे सुरु करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्या आल्याने पुलांच्या दुरूस्तीची कामं करता येणार नाहीत. अंधेरी रेल्वे स्थानक येथील गोखले रेल्वे पुलाच्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.या दुर्घटनेनंतर मुंबईतील 445 पूल, उड्डाणपुलांची पाहणी  रेल्वे व पालिकेने केली होती.

मुंबईत 50 पुलांची अवस्था बिकट आहे. दादरचा  टिळक पूल, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील रेल्वे पूल, करी रोड रेल्वे स्थानक येथील उड्डाणपूल, शीव रेल्वे स्थानक येथील पूल, सायन रुग्णालय धारावी येथील रेल्वे उड्डाणपूल, माहीम फाटक येथील पादचारी पूल आणि धारावी येथील दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पूल या 8 महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत.

या पुलांच्या दुरुस्तीचं कंत्राट मे. कॉम्प्युटर इंजिनीअर्स या कंत्राटदाराला दिलं आहे. लॉकडाऊनमुळे पुलांची कामे रखडली होती. मात्र या कामांना शिथिलता दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही कामे सुरू आहेत. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने ही कामे रखडण्याची शक्यता आहे. 8 पुलांच्या कामासाठी 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.



हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा