Advertisement

Mumbai Local News: सांताक्रूझ पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील 'हा' भाग तात्पुरता बंद

पालिकेनं नागरिकांना हा पर्यायी मार्ग सुचवला आहे.

Mumbai Local News: सांताक्रूझ पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील 'हा' भाग तात्पुरता बंद
SHARES

मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान एमयूटीपी-टप्पा II अंतर्गत सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. या संदर्भात बेस्ट बस डेपोला लागून असलेल्या सांताक्रूझ स्थानकाच्या पूर्वेकडील रेल्वेची जमीन प्रकल्पाशी संबंधित कामांसाठी 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्या मते, सांताक्रूझ स्थानकाच्या पूर्वेकडील रेल्वे जमिनीचे क्षेत्र एमयूटीपी-फेज II अंतर्गत सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पासंदर्भात पायाभूत सुविधांच्या कामासाठी आवश्यक आहे. त्याअंतर्गत अतिरिक्त लाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सीमाभिंत आणि नाल्याचे काम करावयाचे आहे. त्यामुळे, सध्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या जमिनीचा हा भाग 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरता बंद केला जाईल. या कालावधीत प्रवासी सांताक्रूझ स्थानकाच्या पूर्वेकडील साउथ फूट ओव्हर ब्रिजपर्यंत जाण्यासाठी BMC परिसरात उपलब्ध असलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करू शकतात.



हेही वाचा

मुंबईतील 'हा' पूल जून २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी राहणार बंद

अंधेरी ते वर्सोवा अंतर लवकरच गाठता येणार 5 मिनिटात, जाणून घ्या कसं?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा