एमएसआरडीसीचा टोल'झोल'

 Pali Hill
एमएसआरडीसीचा टोल'झोल'

मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ऑक्टोबर 2016मध्ये झालेल्या टोलवसुलीची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (एमएसआरडीसी) दडवल्याचा आरोप टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी केलाय. राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानुसार एमएसआरडीसीनं प्रत्येक महिन्यातील टोलवसुलीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. मात्र नोव्हेंबर संपायला आला तरी अजून ऑक्टोबरच्या टोलवसुलीची माहिती एमएसआरडीसीनं संकेतस्थळावर टाकलेली नाही. राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाचा भंग करत जनतेचीही फसवणूक एमएसआरडीसी आणि कंत्राटदराकडून सुरू असल्याचा आरोप वेलणकर यांनी केलाय. यासंदर्भात त्यांनी माहिती आयुक्तांकडे तक्रारही केलीय. एमएसआरडीसी आणि कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वेलणकर यांनी केलीय.

"ऑक्टोबरमध्ये कंत्राटदाराकडून टोलवसुलीची संपूर्ण रक्कम वसूल होणार होती. त्यामुळे टोलवसुली बंद करण्याची जोरदार मागणी होतेय. याचा चांगलाच धसका कंत्राटदार-एमएसआरडीसीनं घेतलाय आणि म्हणूनच ऑक्टोबरची माहिती अजूनही संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे ही माहिती त्वरीत प्रसिद्ध करावी, असंही वेलणकर यांनी म्हटलंय.

यासंबंधी एमएसआरडीसीचे व्यवस्थापक संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments