मुंबईतल्या झोपडपट्टी विकास आराखड्याला मंजुरी

 Pali Hill
मुंबईतल्या झोपडपट्टी विकास आराखड्याला मंजुरी
मुंबईतल्या झोपडपट्टी विकास आराखड्याला मंजुरी
See all

मुंबई - मुंबईतल्या झोपडपट्टी विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलीय. शहर जिल्हा नियोजन विकास समितीने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 108 कोटी 63 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई शहर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेकरीता 88 कोटी 29 लाख, अनुसूचित जातीसाठी 18 कोटी 76 लाख, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी 15 कोटी 8 लाख 7 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला. तसेच झोपडपट्टीच्या प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरच कामाला सुरुवात केली जाईल.

Loading Comments