Advertisement

लवकरच, दक्षिण मुंबई ते ठाणे दरम्यानचा प्रवास सोईस्कर

लवकरच, दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास लोकांसाठी सोपा होईल!

लवकरच, दक्षिण मुंबई ते ठाणे दरम्यानचा प्रवास सोईस्कर
(Representational Image)
SHARES

लवकरच, दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास लोकांसाठी सोपा होईल! येत्या काही दिवसांत, दक्षिण मुंबईतून ठाण्याला आणि त्याउलट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर न उतरता थेट ईस्टर्न फ्रीवे वापरून प्रवास करता येईल.

ईस्टर्न फ्रीवे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) कडून छेडा नगर जंक्शन ते ठाण्यापर्यंत उन्नत रस्त्यानं रमाबाई कॉलनी, कामराज नगर तसंच घाटकोपरपर्यंत विस्तारित केला जाईल, असं IE अहवालात म्हटलं आहे.

ईस्टर्न फ्रीवेमध्ये दोन उत्तर-बाउंड लेन तसंच दोन दक्षिण-बाउंड लेन आहेत आणि सध्या, ते दक्षिण मुंबईच्या पी डीमेलो रोडपासून सुरू होते आणि चेंबूरमधील शिवाजी नगर इथं संपते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला शिवाजी नगरपासूनचा रस्ता घाटकोपरपर्यंत वाढवायचा होता. मात्र, त्यामुळे खारफुटीचा नाश होणार असल्यानं ही योजना पुढे ढकलण्यात आली. याशिवाय, रस्ता प्रकल्पाच्या मार्गात झोपडपट्ट्यांचा मोठा कप्पाही येत होता, परंतु आता हा प्रश्न सुटला आहे.

अलीकडेच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं जाहीर केलं की, महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्राधिकरणानं पूर्ण केलेल्या कलानगर, वांद्रे (पूर्व) इथल्या सुधारणा आणि सुशोभीकरण कामांचे उद्घाटन केले.

MMRDA नुसार, नॉर्थ प्लाझा, साउथ प्लाझा आणि आयलंड प्लाझा- ही तीन बेटे सुमारे २८२८ स्क्वेअर मीटर क्षेत्रात विकसित करण्यात आली आहेत. यामध्ये २ फूट ते ८ फूट उंचीपर्यंतचे कारंजे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या, विविध प्रकारची फुलांची झाडे इत्यादी आहेत, असं प्राधिकरणानं पुढे सांगितलं.

तसंच, याशिवाय उड्डाणपुलाचे खांबही विविध रंगात रंगवण्यात आले आहेत. याशिवाय उड्डाणपुलाच्या खाली शिल्पकला, बसण्यासाठी ग्रॅनाईटचे बेंच आणि जागेचा योग्य वापर करण्यात आला आहे, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा

विविध मेट्रो प्रकल्पांसाठी ६ हजार ६०४ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी जोडणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा