Advertisement

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी जोडणार

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी जोडणार
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) रस्ता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी जोडण्याचा विचार करत आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्राधिकरण आता एका सल्लागाराच्या शोधात आहे, जो त्याचा सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करेल. तसंच सल्लागार नेमण्यासाठी कशाप्रकारे निविदा काढण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी अहवालात दिली आहे.

यामुळे प्रवाशांना वरळीहून थेट पुण्याला जाण्यास मदत होईल आणि त्यामुळे प्रवासाच्या वेळेत एक तासापेक्षा जास्त वेळ वाचेल, असा दावा अधिकाऱ्यांचा आहे. असा अंदाज आहे की एमटीएचएलला राष्ट्रीय महामार्ग १७शी जोडण्याची योजना आहे जी बंगळुरूच्या दिशेनं जाईल.

त्यांच्यासाठी १८,००० कोटी रुपयांची MMRDA योजना नवी मुंबईच्या बाजूनं शिवडी ते चिरळेला नवी मुंबईच्या बाजूनं जोडणारी २१.८ किमी लांबीचा समुद्रावर पूल बांधणार आहे. अहवालानुसार, सध्या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.



हेही वाचा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा