समस्यांबाबत आ. शिंदेंची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक


  • समस्यांबाबत आ. शिंदेंची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक
  • समस्यांबाबत आ. शिंदेंची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक
SHARE

भायखळा - भायखळा विभागातील इमारतींच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी वरळी विधानसभेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुख्य अधिकारी (म्हाडा), सुमंत भांगे यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेतली.

नळवाला चाळ, साने गुरुजी मार्ग, सातरस्ता पुनर्विकास प्रकल्पांसाठी अनेक जण धारावीतल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या तक्रारीही शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ऐकल्या होत्या. त्यावर कार्यवाही करण्यातल्या विलंबाबाबत जाब विचारून समस्या सुटाव्या, यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितलं. या रहिवाशांना अद्यापही ताबापावती न मिळाल्याबाबत चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अधिकाऱ्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस संबंधित अधिकारी, रहिवाशी आणि शाखाप्रमुख राजेश कुसळेही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या