Advertisement

टाटा पाॅवरच्या ग्राहक केंद्रात 'महिला राज'

टाटा पाॅवर या वीज वितरण कंपनीनं मुंबईत आपलं नवीन ग्राहक सेवा केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र फक्त महिला कर्मचारीच चालवणार अाहेत.

टाटा पाॅवरच्या ग्राहक केंद्रात 'महिला राज'
SHARES

आज भारतीय महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. घर सांभाळण्यापासून विमान चालवण्यापर्यंत अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यातून महिलांची जबाबदारी पेलण्याची ताकद दिसून अाली. त्यामुळेच टाटा पाॅवरने अापल्या नवीन ग्राहक सेवा केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिलांवर सोपवली अाहे. 

टाटा पाॅवर या वीज वितरण कंपनीनं मुंबईत आपलं नवीन ग्राहक सेवा केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र फक्त महिला कर्मचारीच चालवणार अाहेत. मंगळवारी ३१ जुलैला या हे केंद्र सुरू करण्यात अालं.  संपूर्ण महिला कर्मचारी असलेलं हे भारतातील एकमेव केंद्र असल्याचं टाटा पाॅवरकडून सांगण्यात अालं. 


सुरक्षा गार्डसुध्दा महिलाच

मुंबईच्या विविध भागात टाटा वीज कंपनीची २८ ग्राहक सेवा केंद्र आहेत. आता हे २९ वे ग्राहक सेवा केंद्र अंधेरी पूर्व येथील लोखंडवाला कॉंमप्लेक्स इथं सुरु करण्यात आलं आहे. या ठिकाणी सात महिला कर्मचारी आहेत.  विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षा गार्डसुध्दा महिलाच असणार आहे. बील भरण्यापासून ते ग्राहकांकडून आलेल्या सर्व तक्रारींना उत्तर देणं, त्यांच्या तक्रारींच निवारण करणं ही सर्व कामं महिला कर्मचारीच करणार अाहेत.



वीज वितरणासारख्या क्षेत्रात महिलांची ही कामगिरी नक्कीच कैातुकास्पद आहे. आमच्या ग्राहक सेवा केंद्रातील या सातही महिला कर्मचारी अतिशय कुशल आहेत. आम्ही या क्षेत्रात एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनातून आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आहे. आमच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशानं आम्ही हे ग्राहक सेवा केंद्र सुरु केलं आहे. असाच प्रयत्न भारतातील इतरही शहरात केला जावा जेणेकरुन महिलांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिऴेल.
प्रवीर सिंन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा पाॅवर




अाम्हाला अतिशय गर्व होत आहे की आम्ही एक अशा प्रकारचे ग्राहक सेवा केंद्र सुरु केले आहे जे पुर्णपणे महिलाच चालवणार आहेत. आमच्या सर्व महिला ग्राहकांच्या दृष्टीकोनातूनही एक अतिशय समाधानकारक बाब आहे. यामुळे महिलांना काम करण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.
 - शालिनी सिंग, मुख्य कार्पोरेट कम्युनिकेशन अधिकारी, टाटा पाॅवर



हेही वाचा -

गणेशोत्सवातच खड्डे का बुजवले जातात ? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मंगळवारी घ्या मंगळाचं दर्शन



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा