मंगळवारी घ्या मंगळाचं दर्शन

खगोलप्रेमींना आज रात्री मंगळ ग्रहाच्या निरीक्षणाची संधी मिळणार आहे. रात्र सुरू होण्यापूर्वी आकाशात मंगळ ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. त्यामुळे रात्रभर या ग्रहाचं निरीक्षण करता येणार आहे.

SHARE

मंगळवारी ३१ जुलै रोजी अवकाशात एक अद्भूत योग जुळून येणार आहे. लालसर रंगाचा मंगळ ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ म्हणजे ५ कोटी ७५ लाख किलोमीटर अंतरावर येणार असून त्यामुळे साध्या डोळ्यांनीही या ग्रहाचं दर्शन घेता येईल.

खगोलप्रेमींनाही आज रात्री या मंगळ ग्रहाच्या निरीक्षणाची संधी मिळेल. रात्र सुरू होण्यापूर्वी आकाशात मंगळ ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. त्यामुळे रात्रभर या ग्रहाचं निरीक्षण करता येणार आहे.


मंगळ पृथ्वीच्या जवळ

सूर्याभोवती परिभ्रमण करताना कधीकधी सूर्यमालेतील ग्रह एकमेकांपासून कमी-अधिक अंतरावर येत असतात. साधारणपणे मंगळ पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा या दोन्ही ग्रहांमधील अंतर ४० कोटी १० लक्ष किलोमीटर असतं. मात्र आज मंगळवारी मंगळ ग्रह तुलनेने पृथ्वीच्या अधिक जवळ आला आहे.


याआधी कधी दिसला होता?

याआधी १५ वर्षांपूर्वी २७ ऑगस्ट २००३ रोजी मंगळ पृथ्वीजवळ ५ कोटी ५७ लाख किलोमीटर अंतरावर आला होता. यानंतर पुन्हा १७ वर्षांनी ११ सप्टेंबर २०३५ रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ६९ लक्ष किलोमीटर अंतरावर येईल.


हेही वाचा -

अद्भुत! आज अाकाशात दिसणार 'ब्लड मून'!

संबंधित विषय
ताज्या बातम्या