SHARE

नेहमी पांढरा शुभ्र दिसणाऱ्या चंद्राचा रंग ३१ जानेवारी म्हणजेच बुधवारी बदललेला दिसेल. या दिवशी चंद्र पांढरा नाही तर लाल रंगाचा दिसेल. खगोलीय भाषेत याला 'ब्लड मून' म्हटलं जातं. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. यावेळी ब्लड मूनसह ब्ल्यू मून आणि खग्रास चंद्रग्रहण असा तिहेरी योग २० वर्षानंतर जुळून आला आहे! संध्याकाळी ५.३० वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असून ६.२१ ते ७.३८ पर्यंत उघड्या डोळ्याने पाहाता येईल.


चंद्र लाल का?

चंद्र पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना पृथ्वीच्या जवळ असतो. अशावेळी चंद्रग्रहण झालं तर चंद्र लालसर दिसतो. ग्रहणामुळे सूर्याची किरणं पृथ्वीद्वारे अडवली जातील आणि त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. तर त्या सावलीच्या बाजूला पडणारी किरणं संधीप्रकाशित होऊन चंद्रावर पडणार असल्याने पृथ्वीवरून चंद्र लालसर दिसेल. खगोल शास्त्रीय भाषेत याला 'स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स' असं म्हणतात. 


ग्रहणाची वेळ

३१ जानेवारीला भारतात खग्रास चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता या ग्रहणाला सुरुवात होणार असून रात्री ९.३० वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल.


हेही वाचा

रविवारी घ्या सुपरमूनचं दर्शन!


संबंधित विषय
ताज्या बातम्या