टाटाची वीज कडाडली

 Pali Hill
टाटाची वीज कडाडली

मुंबई - वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार रिलायन्स आणि टाटा पॉवरने पुढील चार वर्षासाठीचे 2016 ते 2020 पर्यंतचे वीज दर नुकतेच जाहिर केले आहेत. त्यानुसार रिलायन्सची वीज स्वस्त झाली असून , टाटा पॉवरची वीज मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर कडाडली आहे. रिलायन्सच्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात 2016-17 साठी 1.93 टक्क्यांनी घटवले असून पुढील तीन वर्षांसाठी 0.76, 1.06, 15.13 टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. दुसरीकडे टाटाच्या वीज दरात मात्र 2016-17 साठी 1.85 टक्क्यांनी तर पुढील तीन वर्षांसाठी अनुक्रमे 2.26,2.51 आणि 14.93 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2016-17 साठीचे प्रति युनिटचे दर (रुपये)

ग्राहक रिलायन्स टाटा

बीपीएल 2.67 2.52

0.100 3.60 2.90

101-300 7.65 5.7

301-500 9.09 9.57

550 वरील 10.98 11.84

Loading Comments