•  तीन डोंगरीतील शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
  •  तीन डोंगरीतील शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
SHARE

गोरेगाव - पश्चिमेकडील तीन डोंगरी या ठिकाणी शौचालयाचं काम होऊनसुद्धा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.

तीन डोंगरीच्या जय हिदं मित्र मंडळ, फाटक हॉटेलसमोर गेल्या 6 ते 7 महिन्यापासून शौचालयाचं काम संथ गतीनं सुरू होतं. परिसरातील एक हजारांवर लोकसंख्या असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. यामध्ये पुरुषांसाठी 20 शौचालये बांधण्यात आली होती. त्यातील 10 शौचालय तोडल्यामुळे पुरुषांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रोज सकाळी परिसरात वाद होत असतात मात्र नगरसेविका लोचना चव्हाण यांनी नवीन शौचालयाचं काम पूर्ण केलं. पण आठ दिवस झाले तरी शौचालय सुरू न केल्याचं नागरिकांनी सांगितलं.
याबाबत नगरसेविक लोचना चव्हाण म्हणाल्या की 'कंत्राटदाराने उशीर केला मात्र लवकरच उद्घाटन करू'.

संबंधित विषय
ताज्या बातम्या