Advertisement

पालिका जुन्या पूलांची डागडुजी करणार

देखभालीचे कंत्राट देण्यात येणार असून यासाठी सुमारे २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

पालिका जुन्या पूलांची डागडुजी करणार
SHARES

मुंबईतील काही भागांतील पुलांपाठोपाठ आता शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील सर्वच पुलांची दुरूस्ती होणार आहे. दोन वर्षांसाठी दुरुस्ती आणि देखभालीचे कंत्राट देण्यात येणार असून यासाठी सुमारे २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

पालिकेने शहर आणि उपनगरांतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यानुसार आवश्यक त्या पुलांची पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर काही पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. तर ३० ते ४० वर्षे जुने झालेले पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईतील बहुसंख्य पुलांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरांतील डागडुजी आवश्यक असलेल्या पुलांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पावसानंतर ऑक्टोबरमध्ये ही कामे सुरू होणार आहेत.

शहरातील पुलांच्या दुरुस्तीनंतर पूर्व उपनगरांतील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांच्या दुरुस्तीसाठी जून महिन्यात निविदा अंतिम करण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ वांद्रे पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व आणि पश्चिम, गोरेगाव, मालाड, आर दक्षिण/ कांदिवली, आर मध्य/बोरिवली आणि आर उत्तर/दहिसर, विभागातील कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

गोखले उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे

गोराईतील प्राचीन मंदिर पाडले, एफआयआर दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा