Advertisement

गुडन्यूज! मेट्रो 7 मार्गावरील दोन फूटब्रिज जनतेसाठी खुले

'दहिसर-गुंदवली मेट्रो 7' मार्गावरील प्रवाशांना आता मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे

गुडन्यूज! मेट्रो 7 मार्गावरील दोन फूटब्रिज जनतेसाठी खुले
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 'दहिसर-गुंदवली मेट्रो 7' मार्गावर नऊ फूटब्रिज बांधण्याचे काम हाती घेतले होते. नऊपैकी नॅशनल पार्क आणि दिंडोशी येथील दोन फूटब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजपासून (गुरुवार) हे दोन्ही पूल पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. आता प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

'मेट्रो 7' मार्ग जानेवारीत पूर्ण क्षमतेने धावू लागली. आता 'मेट्रो 7' ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी, तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एमएमआरडीएने फूटब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नऊ पूल बांधण्यात येत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावरून मेट्रो स्थानकाला जाता यावे यासाठी हे पूल बांधले जात आहेत.

राष्ट्रीय उद्यान आणि दिंडोशी येथील फूटब्रिज गुरुवारपासून पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहेत. गुरुवारी सकाळी महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांच्या हस्ते या दोन्ही पुलांचे उद्घाटन करण्यात आले.

नॅशनल पार्क फूटब्रिज 83 मीटर लांब आणि चार मीटर रुंद आहे, तर दिंडोशी फूटब्रिज 112 मीटर लांब आणि चार मीटर रुंद आहे.

राष्ट्रीय उद्यान पुलामुळे द्रुतगती मार्गावरून राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे, तर दिंडोशी पुलामुळे द्रुतगती मार्गावरून दिंडोशी मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.



हेही वाचा

मेट्रो-3 चा पहिला टप्पा आरे ते BKC स्टेशन दरम्यान डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल

मेट्रो 8 मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडेल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा