Advertisement

देशातील पहिले अांतरदेशीय क्रूझ टर्मिनल सुरू

मुंबई पोर्ट ट्रस्टने भाऊचा धक्का परिसरात अांतरदेशीय क्रूझ टर्मिनल उभारलं अाहे. या टर्मिनलमधून 'आंग्रीया' क्रूझने अापला पहिला प्रवास सुरू केला. 'आंग्रीया' ही देशातील पहिली क्रूझ अाहे.

देशातील पहिले अांतरदेशीय क्रूझ टर्मिनल सुरू
Mumbai-Goa Cruise: Angriya
SHARES

पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) ने शनिवारी देशातील पहिल्या अांतरदेशीय क्रूझ टर्मिनलची सुरूवात केली. यावेळी मुंबई ते गोवा जाणारी 'आंग्रीया' नावाच्या पहिल्या भारतीय क्रूझला हिरवा झेंडा दाखवण्यात अाला. शनिवारी अांतरदेशीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात अाली. यावेळी 'आंग्रीया' क्रूझने मुंबई ते गोवा या सागरी मार्गावर प्रवाशांना घेऊन प्रवासाला सुरूवात केली. 


देशातील पहिली क्रूझ 

मुंबई पोर्ट ट्रस्टने भाऊचा धक्का परिसरात अांतरदेशीय क्रूझ टर्मिनल उभारलं अाहे. या टर्मिनलमधून 'आंग्रीया' क्रूझने अापला पहिला प्रवास सुरू केला. 'आंग्रीया' ही देशातील पहिली क्रूझ अाहे. १३१ मीटर लांब अाणि १२०- मीटर रूंद असलेली ही क्रूझ एमवी आंग्रीया, आंग्रीया सागर ईगल्स प्राइवेट लिमिटेडने तयार केली अाहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अारमार प्रमुख कान्होजी अांग्रे यांंचं नाव या क्रूझला देण्यात अालं अाहे. 


१०४ खोल्या

 या अलिशान क्रूझमध्ये १०४ खोल्या अाहेत. आंग्रीया' क्रूझवर ६ बार, २ रेस्टाॅरंट, , एक स्विमिंग पूल, डिस्को, वाचनालय कक्ष, स्पा अादी सुविधा अाहेत. एकावेळी ७० क्रू मेंबरसहीत ४०० प्रवासी या क्रूझने प्रवास करू शकतात.  क्रूझचे भाडे ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत अाहे. 


४० लाख प्रवासी

उद्घाटनप्रसंगी नितिन गडकरी म्हणाले की, आंग्रीया क्रूझ ही फक्त प्रवासी बोट नसून या २०४१ पर्यंत आंग्रीयातून ४० लाख प्रवाशी प्रवास करतील. प्रस्तावीत अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल अाणि अांतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा क्रूझ क्षेत्राला मोठा फायदा होणार अाहे. पुढील १० वर्षात मुंबईतील १० लाख प्रवाशांना या क्रूझ सुविधा दिली जाईल. तसंच पुढील ५ वर्षात या क्षेत्रात अडीच लाख तरूणांना रोजगार मिळेल. 



हेही वाचा - 

मुंबई टू गोवा करा अलिशान क्रूझनं सफर




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा