मुंबई टू गोवा करा अलिशान क्रूझनं सफर

मुंबई ते गोवा आपण विमानानं किंवा एक्स्प्रेसनं नेहमीच जातो.पण एखाद्या आलिशान क्रूझचा आनंद घेण्याची संधी यावेळी मुंबईकरांना देखील मिळाली आहे. मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझ सेवा सुरू करण्यात आली आहे.

  • मुंबई टू गोवा करा अलिशान क्रूझनं सफर
  • मुंबई टू गोवा करा अलिशान क्रूझनं सफर
SHARE

समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात काही क्षण घालवायला का नाही आवडणार? त्यात जर एका आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर? क्या बात...तुम्ही म्हणाल क्रूझ वगैरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडी परवडणारहे तर श्रीमंतांचे चोचले. पण नॉट टू वरी. तुम्हाला परवडेल अशीच आहे मुंबई टू गोवा जाणारी ही क्रूझ


अनोखी सफर

मुंबई ते गोवा आपण विमानानं किंवा एक्स्प्रेसनं नेहमीच जातो.पण एखाद्या आलिशान क्रूझचा आनंद घेण्याची संधी यावेळी मुंबईकरांना देखील मिळाली आहे. मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझ सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून ३ ऑक्टोबरपासून ही क्रूझसेवा सुरू होणार आहे.क्रूझची खासियत

'अांग्रिया'असं या क्रूझचं नाव आहे. अांग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. या क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असं बरंच काही अनुभवता येणार आहे. एका क्रूझमध्ये ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करू शकतील

मुंबईत ही क्रूझ माझगावच्या भाऊचा धक्का इथून सुटणार आहे. ७००० आणि त्याहून अधिक या क्रूझचं तिकिट आहे. ३ ऑक्टोबरनंतर रोज संध्याकाळी ५ वाजता ही बोट भाऊच्या धक्का इथून निघेल ती दुसऱ्या दिवशी ९ वाजता गोव्यात पोहचेलत्यानंतर पुढे ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघीदाभोळरत्नागिरीतला जयगड, विजयदुर्गदेवगडपणजी असे थांबे घेत ही क्रूझ गोव्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.  क्रूझचं नाव अांग्रिया का?

कान्होजी आंग्रे नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज,डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवलं. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचं रक्षण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नावावरून महाराष्ट्र आणि गोव्याच्या दरम्यान प्रवाळांचं एक मोठं बेट आहे, त्याला आंग्रिया बेट असं नाव पडलंआणि त्या बेटावरून या क्रूझला 'अांग्रियाहे नाव देण्यात आलं आहे. ही क्रूझ जपानमधून मागवण्यात आली आहे.

हेही वाचा -

दिवाळीत तरंगतं रेस्टॉरंट मुंबईकरांच्या सेवेत
संबंधित विषय
ताज्या बातम्या