Advertisement

दिवाळीत तरंगतं रेस्टॉरंट मुंबईकरांच्या सेवेत


दिवाळीत तरंगतं रेस्टॉरंट मुंबईकरांच्या सेवेत
SHARES

चहूबाजूंनी निळाभोर समुद्र, खवळणाऱ्या लाटा, सुसाट वारा आणि शांत वातावरणात सागरी सफारीला जाण्याची मजा काही औरच! समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना अशा वातावरणात काही क्षण घालवायला नाही का आवडणार? हेच लक्षात घेऊन आता मुंबईच्या समुद्रातच तरंगते रेस्टॉरंट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे.


कधी होणार सुरू?

मुंबईत १० नोव्हेंबरनंतर तुम्ही तरंगत्या रेस्टॉरंटचा अनुभव घेऊ शकता. रेस्टॉरंटमध्ये अंदाजे ४५० जणांसाठी डायनिंग म्हणजेच जेवणाची व्यवस्था होऊ शकते. परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तरंगत्या रेस्टॉरंटचं उद्धाटन होईल. क्विन्सलाईन नेवरलँड आणि क्विन्स लाईन वायएएच अशी या दोन तंरगत्या रेस्टॉरंटची नावं आहेत. गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर हे रेस्टॉरंट असेल. कदाचित या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचण्यासाठी पिकअप पॉईंट्स असतील. तिकडून दुसरी एखादं जहाज तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये सोडेल.



अखेर प्रतीक्षा संपली आहे. मुंबईकरांसाठी आमचं हे गिफ्ट आहे. मुंबईकर मेहनतीनं काम करतात आणि त्याच उत्साहात त्यांना पार्टी करायला आवडते. आम्ही एक हटके जागा शोधत होतो, जिथे मुंबईकर शांत वातावरणात खाण्याचा आनंद घेऊ शकतात. आम्हाला समुद्राहून दुसरी कुठलीच चांगली जागा सापडली नाही. तुम्ही इथं सुर्यास्ताचा देखील आनंद घेऊ शकता. जागतिक स्तरावरील पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येईल.

- श्रीप्रिया दालमिया-थिरानी



रेस्टॉरंट कोणाचं?

मुंबईत येणारी ही दोन तरंगती रेस्टॉरंट दिल्लीतल्या उद्योजकांची आहेत. म्रिदुल थिरानी आणि श्रीप्रिया दालमिया-थिरानी या दिल्लीतल्या कपलनं मुंबईत तरंगते रेस्टॉरंट सुरू केले आहे. टरकीमधून त्यांनी या दोन शिप खरेदी केल्या आहेत. थिरानी कपलनं शिप खरेदी करताच तिथं भारताचा झेंडा फडकवून आनंद व्यक्त केला. तरंगत्या रेस्टॉरंटमध्ये खाण्या-पिण्याचा वेगळा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथं भेट देऊ शकता. १० नोव्हेंबरनंतर ही दोन तरंगती रेस्टॉरंट तुमच्या सेवेत दाखल होणार आहेत. कदाचित मुंबईकरांना एक वेगळी मजा अनुभवता येईल.



हेही वाचा

आता आलिशान क्रूझनं करा 'मुंबई टू गोवा' सफर

समुद्रावरचं तरंगतं शहर! कोस्टा निओक्लासिका!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा