मनोरंजनासाठी चित्रपटगृह, साहसी खेळ, स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स, मिनी गोल्फ क्लब, अत्याधुनिक जिम्नॅशियम, क्लब्स, लाइव्ह बॅण्ड, कसिनो आणि मोठ्या ब्रॅण्डची दालनं, जिम, जॉगिंग ट्रॅक...या आणि अशा अनेक सोयी-सुविधा तुम्हाला कोणत्याही सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मिळतील. किंबहुना त्या अशाच हॉटेल्समध्ये मिळू शकतात असा अनेकांचा गैरसमज असतो. पण त्या गैरसमजाला आता छेद जाणार आहे. कारण या सर्व सुविधा तुम्हाला एका आलिशान क्रूझमध्ये अनुभवता येणार आहेत!
आलिशान क्रूझ जहाजावरून समुद्र पर्यटन हा प्रकार अलिकडच्या काळात खूपच लोकप्रिय झाला आहे. जगभरातील श्रीमंत पर्यटक अशा जलप्रवासाचा आनंद नेहमीच घेत असतात. चहुबाजूंनी निळाशार समुद्र, उफाळणाऱ्या लाटा अशा वातावरणात समुद्रसफारी करायला कुणाला नाही आवडणार? तुम्हाला देखील जलप्रवासाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल, तर तुमच्यासाठी 'कोस्टा क्रूझ' हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
इटलीतील प्रसिद्ध 'कोस्टा क्रूझ'नं मुंबई ते मालदीव या मार्गावर 'कोस्टा निओक्लासिका' ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. कोस्टा निओक्लासिका क्रूझ ही मुंबई-कोचीन-मालदीव या मार्गानं प्रवास करणार आहे.
हेही वाचा : मुंबईत पुन्हा आलं तरंगतं हॉटेल!
एखाद्या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा या क्रूझमध्ये अनुभवता येणार आहेत! जिमपासून ते शॉपिंग दालनांपर्यंत सर्व सुविधा या क्रूझमध्ये असणार आहेत. याशिवाय वाचन प्रेमींसाठी या क्रूझमध्ये सुसज्ज असं एक ग्रंथालय सुद्धा आहे. या क्रूझमध्ये ६५४ केबिन्स असून १ हजार ७०० पर्यटक प्रवास करू शकतात. यामध्ये दोन प्रकारच्या केबिन्स आहेत. एक म्हणजे समुद्राचा देखावा पाहता येईल अशा केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सूटचा यात समावेश आहे. समुद्रावरच्या एखाद्या तरंगत्या शहरापेक्षा हे काही कमी नाही!
मुंबई ते कोचीन दरम्यानचा क्रूझचा प्रवास ४ दिवस आणि ३ रात्री असा असेल. तर मालदिवपर्यंतचा प्रवास ८ दिवस ७ रात्री असा असणार आहे. मुंबईतून दर पंधरा दिवसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल इथून रविवारी ही क्रूझ निघते. पण यासाठी तुम्हाला ४३ हजार रुपये मोजावे लागतील. पण एवढी खात्री आहे की हा तुमचा लाइफ टाईम एक्सपिरीयन्स असेल. यासाठी तुम्हाला त्यांच्या http://www.costacruiseindia.com/3-nights-cochin-male वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.
हेही वाचा