Advertisement

देशातल्या पहिल्यावहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन


देशातल्या पहिल्यावहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन
SHARES

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक अाणि नौवहन मंत्री नितीन गडकरी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी देशातल्या पहिल्यावहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन करण्यात अालं. मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं अायोजित करण्यात अालेल्या या कार्यक्रमात १.५ लाख युवकांना रोजगार मिळेल, असं अाश्वासन गडकरी यांनी दिलं.


६ क्रूझ टर्मिनल बनविण्याचा निर्णय

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक अाणि नौवहन मंत्रालयाने क्रूझ वाहतुकीला चालना देण्यासाठी ६ क्रूझ टर्मिनल बनविण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याअंतर्गत अाज मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं देशातल्या पहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन करण्यात अालं. तीन टप्प्यांमध्ये टर्मिनलची उभारणी केली जाणार असून त्यासाठी ६५०० कोटी रुपये खर्च येणार असून तीन वर्षांत हे टर्मिनल उभे राहणार अाहे.


क्रूझ टर्मिनलची खासियत

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून टर्मिनलची उभारणी केली जाणार

२०१९ पर्यंत टर्मिनल तयार करण्याचं उद्दिष्ट

३.५ लाख स्क्वेअर फूटवर उभं राहणार टर्मिनल

२४० दिवस होणार वाहतूक

५००० प्रवासी क्षमतेचं असणार हे टर्मिनल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा