गणेश करंडकावर एअर इंडियाने कोरले नाव

  Mumbai
  गणेश करंडकावर एअर इंडियाने कोरले नाव
  मुंबई  -  

  पुण्यातील 'दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट'तर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना पुरूष विभागातील एअर इंडिया व आयकर मुंबई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एअर इंडिया संघाने आयकर संघावर 46-21 अशी मात करीत गणेश करंडकावर आपले नाव कोरले.

  मध्यंतराला एअर इंडिया संघाकडे 29-10 अशी आघाडी होती. मध्यंतरापूर्वी एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाई व मोनू याने आक्रमक चढाया करीत मैदान दणाणून सोडले. विकास काळे व उमेश म्हात्रे यांनी काही चांगल्या पकडी घेतल्याने एअर इंडियाने 11 व्या मिनिटाला व 19 व्या मिनिटाला आयकर संघावर लोन चढवत निर्णायक आघाडी केली.

  एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाईने मध्यंतरानंतरही आपले आक्रमण सुरू ठेवले. त्याचे हे आक्रमण आयकरला थोपविणे अवघड जात होते. एअर इंडियाने मध्यंतरानंतर 13 व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवत सामना जिंकला. आयकर संघाच्या निलेश साळुंके याने चांगला प्रतिकार केला, तर तुषार पाटील व कृष्णा मदने यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.