Advertisement

अाशियाई चषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 'हे' कबड्डीपटू निवडीच्या शर्यतीत


अाशियाई चषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 'हे' कबड्डीपटू निवडीच्या शर्यतीत
SHARES

जकार्ता (इंडोनेशिया) इथं १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या १८व्या अाशियाई चषक कबड्डी स्पर्धेकरिता भारतीय पुरुष संघाचं सराव शिबिर सध्या हरियाणा इथं सुरू अाहे. महिला संघाचं सराव शिबिरही गांधीनगर, गुजरात इथं सुरू अाहे. या सराव शिबिरातूनच भारताच्या पुरुष अाणि महिला संघाची निवड केली जाणार अाहे. महाराष्ट्राचे अव्वल पुरुष अाणि महिला कबड्डीपटू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक अाहेत.


या खेळाडूंवर भिस्त

महाराष्ट्राचा गिरीश इरनाक (ठाणे), निलेश साळुंखे (ठाणे), रिशांक देवाडिगा (मुंबई उपनगर), सचिन शिंगाडे (सांगली) अाणि विकास काळे (पुणे) यांची पुरुष संघाच्या सराव शिबिरात निवड झाली अाहे. त्यापैकी गिरीश इरनाक अाणि रिशांक देवाडिगा यांची निवड पक्की मानली जात अाहे. महिलांमध्ये अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर), सायली केरीपाले (पुणे), सायली जाधव (मुंबई उपनगर) अाणि स्नेहल शिंदे (पुणे) यांची सराव शिबिरासाठी निवड झाली असून अभिलाषा म्हात्रे हिची निवड जवळपास निश्चित अाहे.


असा असेल स्पर्धेचा कार्यक्रम?

आशियाई स्पर्धेकरिता भारताच्या पुरुष कबड्डी संघाची अंतिम निवड १५ जूनला होईल तर महिला कबड्डी संघाची निवड १७ जूनला जाहीर होईल. अाता अंतिम संघात महाराष्ट्राचे किती पुरुष व महिला खेळाडू स्थान मिळवतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार अाहे.


हेही वाचा -

फझल अत्रचलीवर यू मुंबाची १ कोटींची बोली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा