फझल अत्रचलीवर यू मुंबाची १ कोटींची बोली

इराणचा चढाईपटू फझल अत्रचली याला विकत घेण्यासाठी सर्व संघमालकांकडून चांगलीच चुरस रंगली होती. अखेर यू मुंबाने तब्बल एक कोटी रुपयांची बोली लावत फझल अत्रचलीला अापल्या संघात विकत घेतले अाहे.

SHARE

अायपीएलचा धमाका संपल्यानंतर अाता सर्वांना उत्सुकता लागून राहिली अाहे ती प्रो-कबड्डी लीगची. मुंबईत अाजपासून प्रो-कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली अाहे. इराणचा चढाईपटू फझल अत्रचली याला विकत घेण्यासाठी सर्व संघमालकांकडून चांगलीच चुरस रंगली होती. अखेर यू मुंबाने तब्बल एक कोटी रुपयांची बोली लावत फझल अत्रचलीला अापल्या संघात विकत घेतले अाहे. प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात कोट्यवधी रुपयांची बोली लागलेला फझल अत्रचली हा पहिला खेळाडू ठरला अाहे.


इराणच्या खेळाडूंचा बोलबाला

फझल अत्रचलीनंतर इराणच्या अन्य खेळाडूंनीही प्रो-कबड्डी लीगच्या लिलावाचा अाजचा पहिला दिवस गाजवला. इराणच्या अबोझार मोहाजेरमिघानी याच्यावर तेलगू टायटन्सने ७६ लाखांची बोली लावली. अबोफझल मघ्सोलोऊमहाली या इराणच्या बचावपटूला यू मुंबाने २१.७५ लाखांना विकत घेतले. यू मुंबाने इराणच्या तीन खेळाडूंना संघात विकत घेतले अाहे.


यू मुंबाचा बचाव भक्कम करणे यालाच अाम्ही प्राधान्य दिले. फझल अत्रचलीला पुन्हा एकदा संघात स्थान देताना अाम्हाला अानंद झाला अाहे. अनुप कुमारने गेली कित्येक वर्षे यू मुंबाची कमान सांभाळली होती. पण यावेळेला अाम्ही संघात बदल करण्याचे ठरवले. सर्वात तंदुरुस्त खेळाडूंना अाम्ही निवडले अाहे.
- राॅनी स्क्रूवाला, यू मुंबाचे मालक


हेही वाचा -

प्रो कबड्डी लीगमध्ये ४२२ खेळाडूंवर लागणार बोली

प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!

संबंधित विषय
ताज्या बातम्या