प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!

Mumbai
प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!
प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!
प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!
See all
मुंबई  -  

देशात आयपीएलनंतर दुसऱ्या क्रमांकाची लीग म्हणजे प्रो कबड्डी! एकीकडे क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदावरुन वाद सुरु असतानाच प्रो-कबड्डीमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

यू मुम्बाचे प्रशिक्षक इ भास्करन यांनी प्रो कबड्डी लीगचे कौतुक केले आहे. ते म्हणाले 'आयपीएलनंतर भारतात सध्या प्रो-कबड्डी लीगचा दुसरा क्रमांक लागतो. काही दिवसांनी प्रो-कबड्डी हा आयपीएलच्या बरोबरीत येईल'. 'छोठा पॅकेट बडा धमाका' असे म्हणत त्यांनी प्रो-कबड्डीच्या प्रसिद्धीचे कौतुकही केले.

मैदानात माझा चेहरा वेगळा असतो, ते खेळाडूंना माहीत आहे. खेळाडूंकडून सराव हा तगडाच झाला पाहिजे आणि तो मी करून घेतो. पण मैदानाबाहेर आम्ही एक मित्र असून मित्राप्रमाणेच वागतो', असे सांगत ई भास्करन यांनी प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील नाते-संबंधांबद्दल सांगितले.

यावेळी टीम वाढवण्यात आली असून आम्हाला चांगले रायडर आणि डिफेंडर मिळाले आहेत. टीममध्ये यावेळी 6 रायडर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

'टीमला फिट ठेवणे गरजेचे आहे. जर फिटनेस ठेवला नाही, तर त्याचा प्रभाव खेळावर पडतो. यावेळी खेळाडूंना डेहराडूनमध्ये फिटनेस प्रशिक्षण देण्यात आले. तिथले वातावरण चांगले आहे. तसेच तेथे मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्यामुळे सराव आणखी चांगल्या प्रकारे करता आला. तेथे ऑक्सिजनची कमी असली तरी त्याचा फायदा मात्र टीमला होईल', असेही भास्करन म्हणाले.


प्रतिस्पर्धी संघ कमजोर आहे, असे मी म्हणणार नाही. सामना होईल तेव्हा समजेल. प्रत्येक संघासोबत आमचा सामना तीन वेळा होणार आहे. मुंबईकरांमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. यावेळी आमचा संघ शंभर टक्के जिंकणारच!

इ. भास्करन, प्रशिक्षक, यू मुम्बा

यावेळी त्यांनी युमुंबाचा कर्णधार अनुपचेही कौतुक केले. ते म्हणाले, अनुप हा आमच्यासाठी एक बेस्ट कर्णधार आहे. त्याच्यावर दबाव असला, तरी तो चेहऱ्यावर मात्र दाखवत नाही. तो एक मेहनती खेळाडू आहे. 4 नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 16 ऐवजी 22 सामने खेळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

युमुंबाचा खेळाडू नितीन मदने आणि काशी अडाके या दोघांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले, 'आम्ही एकाच जिल्ह्यातले आहोत, महाराष्ट्र, सांगली जिल्हा आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही संघांकडून आम्ही एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे युमुंबाला आमचा नक्कीच फायदा होईल.'डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.