Advertisement

तुम्ही पंगा घेणार का? 28 जुलैपासून 'प्रो-कबड्डी'ला सुरुवात


तुम्ही पंगा घेणार का? 28 जुलैपासून 'प्रो-कबड्डी'ला सुरुवात
SHARES

क्रिकेट देशातील लोकप्रिय खेळ असला तरी मागील 4 वर्षांत 'प्रो-कबड्डी'ने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. ही स्पर्धा तर आता 'आयपीएल'लाही टक्कर देत आहे.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या सीझनची सुरुवात 28 जुलै पासून होत असून हा सीझन 28 जुलै ते 28 ऑक्टोबर, असे तीन महिने रंगणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.


चार नवे संघ

यावर्षी 4 नवीन संघांचा स्पर्धेत समावेश झाल्याने स्पर्धेत एकूण 12 संघ खेळणार आहेत. तामिळनाडू, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि गुजरात हे चार नवीन संघ यंदाच्या स्पर्धेत इतरांना टक्कर देतील.


कोट्यवधींचा खर्च

संघ मालक आपल्या टीममध्ये चांगला खेळाडू यावा याकरीता सढळ हस्ते खर्चही करत आहेत. यंदा 227 खेळाडूंवर 46.99 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आले आहेत.


नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू

पाचव्या सीझनमधील सगळ्यात महागडा खेळाडू नितीन तोमर ठरला आहे. नितिन केवळ पाचव्या सीझनमधील नव्हे, तर प्रो-कबड्डी लीगमधील आतापर्यंतचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. उत्तर प्रदेशच्या संघाने त्याला 93 लाख रुपयांना खरेदी केले आहे.


12 ठिकाणी सामन्यांचे आयोजन

प्रो-कबड्डीतील सामने एकूण 12 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. त्यात प्रत्येक संघाचे होम ग्राऊंड असणार आहे. हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, कोलकाता, हरियाणा, रांची, दिल्ली, चेन्नई, जयपूर आणि पुणे या 12 शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन होणार आहे.


पहिला सामना 28 जुलैला

स्पर्धेतील पहिला सामना 28 जुलैला हैदराबाद येथे होणार आहे. तर 28 ऑक्टोबरला चेन्नईत स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल.


स्पर्धेतील 12 संघ एकूण 138 सामने खेळेल. ही स्पर्धा 13 आठवडे चालणार असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल.


- अनुपम गोस्वामी, लीग कमिशनर


स्पर्धेतील सगळ्यांचा आवडता संघ 'यू मुम्बा'ची तयारी जोरात सुरु आहे. पाचव्या सीझनमध्ये खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी आम्ही सर्वजण प्राणपणाने खेळ करु. उत्तराखंडमधील देहरादून येथे संघासाठी प्रशिक्षण शिबीर भरवण्यात आले आहे. या शिबिरात फिटनेस राखण्यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत. भास्कर सर, शेट्टी सर आमच्याकडून खडतर सराव करुन घेत आहेत.


- अनुप कुमार, यू मुम्बामुंबईत होणारे सामने

25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट, 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या 6 दिवसांत मुंबईत सामने खेळवले जातील.

25 ऑगस्ट
यू मुम्बा वि. जयपूर पिंक पॅॅन्थर
बेंगाल वॉरियर्स वि. पटना पायरेट्स

26 ऑगस्ट
पटना पायरेट्स वि. तामिल थलैवाज
यू मुम्बा वि. पुणेरी पलटण

27 ऑगस्ट
बेंगाल वॉरियर्स वि. बेंगळूरु बुल्स
यू मुम्बा वि. दबंग दिल्ली

29 ऑगस्ट
बेंगळूरु बुल्स वि. यूपी योद्धा
यू मुम्बा वि. गुजरात फॉर्च्युन जायन्ट्स

30 ऑगस्ट
यू मुम्बा वि. हरयाणा स्टीलर्स

31 ऑगस्ट
तेलुगू टायटन्स वि. तामिल थलैवाज
यू मुम्बा वि. जयपूर पिंक पॅॅन्थर

22 ऑक्टोेबर
क्वॉलिफायर 1 विरुद्ध क्वालिफायर 2

23 ऑक्टोबर
क्वॉलिफायर 3 विरुद्ध एलिमिनेटर 1हे देखील वाचा -

विजेंदर सिंग मुंबईत लढणार!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा