विजेंदर सिंग मुंबईत लढणार!

Worli
विजेंदर सिंग मुंबईत लढणार!
विजेंदर सिंग मुंबईत लढणार!
विजेंदर सिंग मुंबईत लढणार!
See all
मुंबई  -  

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या बॉक्सर्सना पाणी पाजून व्यावसायिक बॉक्सिंग रिंगमध्ये नावलौकिक मिळवलेला भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग पुन्हा एकदा विजेतेपदासाठी झुंज देण्यास सज्ज झाला आहे.

'बॅटलग्राऊंड' स्पर्धेत विजेंदरचा खिताब पणाला लागला आहे. येत्या 5 ऑगस्टला विजेंदर मुंबईतील लढतीत चीनच्या प्रतिस्पर्ध्यासोबत दोन हात करणार आहे.

बहुचर्चित 'बॅटलग्राऊंड' स्पर्धा अाशियातील सर्वात मोठी बॉक्सिंग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या लढतीत चीनमधील आघाडीचा बॉक्सर 'डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन' जुल्फिकार मैमताली विजेतेपदासाठी भारताचा ऑलिम्पिक कांस्यपद विजेता तसेच 'डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन' विजेंदरला आव्हान देणार आहे.

ही स्पर्धा 'डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट' किताब आणि 'डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट' खिताब यासाठी होणार आहे. ही स्पर्धा एनएससीआय स्टेडियम, वरळी येथे होणार आहे.

हा सामना दुहेरी खिताबासाठी असल्याने स्पर्धेत जो बॉक्सर ही लढत जिंकेल त्याला दुसऱ्याचा खिताब मिळेल. सामन्याच्या शेवटी हरलेल्या स्पर्धकाचा 'बेल्ट' विजेत्या स्पर्धकाकडे येईल.विजेंदरची आतापर्यंतची वाटचाल

विजेंदर ऑलिम्पिक कास्यंपदक विजेता बॉक्सर आहे. देशासाठी सर्वोत्तम दिल्यानंतर त्याने व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेत आठ वेळा अपराजित राहण्याचा मान पटकावला आहे.

विजेंदरला बॉक्सिंग रिंगमधील 30 राऊंडचा अनुभव आहे. विजेंदरने पहिले जेतेपद ऑस्ट्रेलियाच्या केरी होप विरोधात जुलै 2016 मध्ये जिंकले.

ही लढत जिंकून तो 'डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मीडलवेट चॅम्पियन' बनला. विजेंदर आपला शेवटचा सामना टांझानियाच्या फ्रान्सिक चेका विरोधात जिंकला आहे.

तर, जुल्फिकार देखील आठ सामने अपराजित आहेत आणि त्याला 24 राऊंडचा अनुभव आहे.चाहत्यांसाठी सुवर्णसंधी

विजेंदर सिंगने या स्पर्धेचे पहिले तिकीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या निवासस्थानी जाऊन दिले.

नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताचे सर्वोत्कृष्ट बॉक्सर विजेंदर सिंग, आॅलिम्पिक क्वॉर्टर फायनलिस्ट अखिल कुमार आणि जितेंदर कुमार या तिघांना एकाच रिंगमध्ये पाहता येईल.

आवडते बॉक्सिंग स्टार एकत्र पाहता येणार असल्याने ही स्पर्धा चाहत्यांसाठी मोठी सुवर्णसंधी असेल. 'बॅटलग्राऊंड एशिया'चे तिकीट 1200 ते 12,000 रुपयांदरम्यान आहे.

1 जुलैपासून या स्पर्धेचे तिकीट 'बुक माय शो' या अॅपवर उपलब्ध होतील.


ही एक रोमांचक लढत असेल. या लढतीत मी माझे विजेतेपद राखून दुसरे विजेतेदही मिळवणार आहे. बॉक्सिंग हा माझा श्वास आहे. ही लढत जिंकण्यासाठी मी गेल्या तीन महिन्यांपासून खडतर प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे.


- विजेंदर सिंग, बॉक्सर


'बॅटलग्राऊंड एशिया'तील इतर स्पर्धक

अखिल कुमार
ज्युनिअर वेल्टरवेट, 63 किलो

जितेंदर कुमार
लाईटवेट, 61 किलो

नीरज गोयात
वेल्टरवेट, 66 किलो

कुलदीप धांडा
लाईटवेट, 61 किलो

प्रदीप खरेरा
वेल्टरवेट, 66 किलो

धर्मेंद्र गरेवाल
क्रूजरवेट, 89 किलो


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.