Advertisement

प्रो कबड्डी लीगमध्ये ४२२ खेळाडूंवर लागणार बोली


प्रो कबड्डी लीगमध्ये ४२२ खेळाडूंवर लागणार बोली
SHARES

अायपीएल संपल्यानंतर क्रीडाशौकिनांना प्रो-कबड्डी लीगची पर्वणी अनुभवता येणार अाहे. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमाचा लिलाव ३० अाणि ३१ मे रोजी मुंबईत रंगणार असून जगभरातील ४२२ खेळाडूंवर बोली रंगणार अाहे. फ्यूचर कबड्डी हिरोज प्रोग्रॅममधून अालेले ८७ कबड्डीपटू अाणि परदेशातील ५८ खेळाडूंचा या लिलावात सहभाग असणार अाहे. त्याचबरोबर भारतासह इराण, बांगलादेश, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया अाणि श्रीलंका यांसह १४ देशांच्या खेळाडूंवर बोली लागणार अाहे.


प्रो कबड्डी लीगने खेळ, धोरण अाणि खेळाच्या वाढीबाबत नेहमीच एक सर्वोच्च दर्जा प्रदान केला अाहे. सहाव्या मोसमातही प्रेक्षकांना खेळाची अस्सल मजा देण्याचा अामचा प्रयत्न असणार अाहे.
- अनुपम गोस्वामी, प्रो-कबड्डी लीगचे कमिशनर



अशी असेल लिलाव प्रक्रिया

  • १२ फ्रँचायझींना १८ ते २५ खेळाडू निवडण्याची मुभा
  • ९ फ्रँचायझींनी २१ कबड्डीपटू रिटेन केले अाहेत. 
  • फ्यूचर हिरोज प्रोग्रॅममधून अालेल्या ३ खेळाडूंची निवड प्रत्येक संघाला करता येईल.
  • जर टीमने चार खेळाडू रिटेन केले असतील तर त्यांना १ फायनल बिड मॅच पर्याय देण्यात येईल.
  • जर एखाद्या टीमने चारपेक्षा कमी खेळाडू रिटेन केले असतील तर त्यांना दोन वेळा फायनल बिड मॅच पर्यायाचा वापर करता येईल.
  • एका संघाला परदेशातील २ ते ४ खेळाडूच निवडता येतील. 
  • प्रत्येक संघाकडे खेळाडू विकत घेण्यासाठी ४ कोटी रुपयांची रक्कम असेल.


  • प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदेवर मारहाणीचा गुन्हा दाखल

    प्रो कबड्डी स्टार काशिलिंग, रिशांकची प्रशिक्षकपदी निवड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा