Advertisement

प्रो कबड्डी स्टार काशिलिंग, रिशांकची प्रशिक्षकपदी निवड


प्रो कबड्डी स्टार काशिलिंग, रिशांकची प्रशिक्षकपदी निवड
SHARES

प्रो कबड्डीत आपली छाप पाडलेल्या काशिलिंग आडके, रिशांक देवाडीगा, आणि सचिन शिंगाडे यांची हरियाणात होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. यांच्यासोबतच महिला गटासाठी पूजा शेलार, सायली जाधव आणि अभिलाषा म्हात्रे यांची देखील प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर इराणमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी या शिबिरातल्या खेळाडूंची निवड करण्यात येईल.

हरियाणातील स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या डी. एल. नॉर्दन सेंटर येथे ३० ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून निवड झालेले पुरुष आणि महिलांचा संघ १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून इराणमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रस्थान करतील.


खेळाडूंची तयारी सुरू

या स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी सुरू असून त्यांची आणखी प्रगती व्हावी यासाठी प्रशिक्षण शिबिरातून प्रयत्न केले जाणार आहे. नुकतेच प्रो कबड्डी लीगमधून यू मुम्बा संघ बाहेर पडला. यामधील आक्रमक खेळ करणारा कबड्डीपटू काशी तसेच युपीचा योद्धा मुंबईकर रिशांक या दोघांची शिबिराच्या प्रशिक्षकवदी निवड झाल्यामुळे आता आतंरराष्ट्रीय पातळीवरची दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी ते सज्ज झाले आहे. हरियाणा येथे हे शबीरी 20 दिवसांसाठी भरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातून तीन पुरूष आणि तीन महिलांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा