Advertisement

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी


फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी
SHARES

राष्ट्रीय स्पर्धेनंतर मानाची समजली जाणाऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेला जोगेश्वरी येथील एसअारपी ग्राऊंडवर सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या पुरुष अाणि महिला संघांनी अापापले उद्घाटनाचे सामने जिंकून दमदार सलामी दिली अाहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने सलामीच्या सामन्यात केरळचा ४७-२१ असा धुव्वा उडवला असला तरी पुरुषांना मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला.


कोमल देवकरचे एकाच चढाईत चार गुण

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला जेतेपदापर्यंत मजल मारण्यात अपयश अाले असले तरी घरच्या मैदानावर रंगणाऱ्या फेडरेशन कपमध्ये मात्र अापल्या चाहत्यांना निराश केले नाही. सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत महाराष्ट्राच्या महिला संघाने १७-१० अशी अाघाडी घेतली होती. त्यानंतरही खेळात सातत्य राखत महिला संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. महाराष्ट्राच्या अाक्रमणाची भिस्त सांभाळणाऱ्या कोमल देवकर हिने एकाच चढाईत चार गडी टिपले. कोमलने प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवून गुणफलक हलता ठेवला. सायली केरीपाळे हिने १० चढायांमध्ये ८ गुण मिळवून तिला चांगली साथ दिले. अभिलाषा म्हात्रेने ४ यशस्वी पकडी केल्या.



पुरुषांचा निसटता विजय

नुकतंच राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाला मात्र विजयासाठी फारच घाम गाळावा लागला. उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला विजयासाठी चांगलेच झुंजवले. अखेर अ गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर ३४-३३ असा निसटता विजय मिळवला. रिशांक देवाडिगाने २२ चढायांत १ बोनस अाणि ८ गुण मिळवले तरी दोन वेळा त्याची पकड झाली.


हेही वाचा -

मुंबईत ११ वर्षांनंतर रंगणार फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा