Advertisement

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची विभागस्तरीय कबड्डी सामन्यासाठी निवड


स्वामी मुक्तानंद हायस्कूलची विभागस्तरीय कबड्डी सामन्यासाठी निवड
SHARES

चौदा वर्षीय मुलींच्या कबड्डी सामन्यात चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलची विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी चौदा वर्षीय गटात स्वामी मुक्तानंद हायस्कूलनं अंतिम फेरीत विजेतपद पटकावलं आहे. येत्या १९ ऑक्टोबर रोजी विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार आहे.


शुक्रवारी विभागीय स्पर्धा 

मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयावतीनं १५ ऑक्टोबर रोजी १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं मालाड उत्कर्ष विद्यामंदिरच्या मैदानात आयोजन केलं होतं. या स्पर्धेत उपनगरातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या अंतिम फेरीत चेंबूरच्या मुक्तानंद हायस्कूलनं भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिरचा ४७-३२ असा पराभव करतं विजेतेपद मिळवलं. मुक्तानंद हायस्कूलच्या गायत्री देवळेकर, रविना थोरात व वेदांती सकपाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  येत्या १९ ऑक्टोबर रोजी विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार असून हे सामनेही मालाडमध्ये खेळवले जाणार आहे.


माझ्या शाळेतील मुलींच्या कबड्डी संघाची विभागीय पातळीवर निवड झाल्याचा मला फार अभिमान आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलींचा संघ कबड्डीसाठी विशेष मेहनत घेत अाहेत. शाळेतील क्रिडा शिक्षक अनिल शेडगे, लक्ष्मण जाधव,लक्ष्मण वाघमोडे यांचंही विशेष सहकार्य लाभलं आहे. अथक मेहनत व परीश्रम यामुळं शाळेच्या कबड्डी संघाला हे यश प्राप्त झालं आहे.
 -  विवेक थोरात, मुख्याध्यापक, मुक्तानंद हायस्कूलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा