Advertisement

विकास, वी.एस.एस.जी,विजय क्लब, गोलफादेवी उपांत्य फेरीत


विकास, वी.एस.एस.जी,विजय क्लब, गोलफादेवी उपांत्य फेरीत
SHARES

आदर्शनगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या कबड्डी सामन्यात विकास, वी एस.एस.जी.,विजय क्लब या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. विकासने दिलखुशचा 40-14 असा धुव्वा उडवला. सावध सुरुवात करीत मध्यंतराला 17-07 अशी आघाडी घेणाऱ्या विकासने नंतर आणखी जोरात खेळ करीत 26 गुणांनी सामना खिशात टाकला. आकाश मयेकर, राज सिंग विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच दिलखुशच्या सुमित कदमला पायजे तसा सूर सापडला नाही.

एस.एस.जी.फाउंडेशनने ओम् श्री साईनाथ ट्रस्टचा कडवा प्रतिकार 30-24 असा परतवून लावला. पंकज मोहिते, सरोज चाचे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर फाउंडेशनने विश्रांतीला 22-07 अशी मोठी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र साईनाथच्या श्रेयश कामतेकर,सिद्धेश राऊत यांनी जोरदार प्रतिहल्ला करत ही आघाडी भरून काढण्याचा सपाटा लावला. परंतु वेळेचे गणित त्यांना न साधता आल्यामुळे 6 गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. 

विजय क्लबने ओम् ज्ञानदीपचे आव्हान 32-21 असे संपविले. तर पूर्वार्धात 15-08 अशी आघाडी घेणाऱ्या विजयने उत्तरार्धात सावध खेळ करत आहे ती आघाडी टिकवण्यावर भर दिला व सामना आपल्या नावे केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा