Advertisement

Live update- भारत बंद

SHARE

पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईविरोधात काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी 'भारत बंद' पुकारला आहे. बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढला जात आहे. तर हा बंद शांततेच्या मार्गाने करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमिवर देशभरात ठिकठिकाणी दुकानं, बाजारपेठा आणि कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान या 'भारत बंद' आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स 'मुंबई लाईव्ह'वर

LIVE UPDATES

01:23 PM, Sep 10 IST
घाटकोपरमध्ये रेल रोको

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

01:18 PM, Sep 10 IST
दुपारच्या सत्रातील सगळ्या शाळा बंद

'भारत बंद'मुळे दुपारच्या सत्रातील सगळ्या शांळांना सुट्टी

01:14 PM, Sep 10 IST
सायन पनवेल महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

सायन पनवेल महागार्ग रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

12:30 PM, Sep 10 IST
मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

12:25 PM, Sep 10 IST
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
12:02 PM, Sep 10 IST
आतापर्यंत 14 बेस्ट बसचं नुकसान
11:41 AM, Sep 10 IST
नवी मुंबईतील एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मनसे कार्यकर्त्यांनी केलं बंद

हात जोडून गांधीगिरी करत कार्यकर्त्यांनी कांदा बटाटा मार्केट पाडलं बंद

11:37 AM, Sep 10 IST
दिंडोशीमध्ये भाजप नगरसेवकाचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं
11:27 AM, Sep 10 IST
शिवसेना भवन परिसरात मनसेकडून 'अच्छे दिन'ची प्रेतयात्रा
11:26 AM, Sep 10 IST
संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात
10:30 AM, Sep 10 IST
काँग्रेस नेत्यांचा मुंबईच्या लोकलमधून प्रवास
10:28 AM, Sep 10 IST
मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो अडवली

मनसे कार्यकर्त्यांनी डीएननगर स्थानकात मेट्रो ट्रेनची वाहतूक अडवल्याने मनसे अंधेरी विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

10:25 AM, Sep 10 IST
दादरमध्ये 50हूून अधिक मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
10:24 AM, Sep 10 IST
अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
10:12 AM, Sep 10 IST
दादरमध्ये अच्छे दिनची प्रतिकात्मक प्रेत यात्रा
10:11 AM, Sep 10 IST
डीएननगरला मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली
10:09 AM, Sep 10 IST
चेंबूरमध्ये आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
10:08 AM, Sep 10 IST
दिंडोशी-गोरेगाव परिसरात बंदसाठी मनसे रस्त्यावर
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा