Advertisement

live update- महाराष्ट्रातील सत्तास्थापना, पहा ताज्या घडामोडी

SHARE

राज्यात महाविकास आघाडीच्या नावाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं सरकार स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्याने राज्यात नव्या राजकीय समिकरणांना सुरूवात झाली आहे.

LIVE UPDATES

05:15 PM, Nov 29 IST
आरे संदर्भात उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती

पुढच्या आदेशापर्यंत आरेतील एकही पान तोडता येणार नाही

मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती


05:12 PM, Nov 29 IST
आरे कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे
05:09 PM, Nov 29 IST
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला

देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा

मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं सांगितलं नव्हतं -उद्धव ठाकरे

न सांगता म्हणून मुख्यमंत्री म्हणून आलोय - उद्धव ठाकरे

मोठी आव्हानं पाहून मी पळालो नाही

प्रथा, परंपरा माहित नाही तरी शिवधनुष्य उचललं आहे

महागाईचा सामना महाविकासआघाडीला करायचा आहे04:02 PM, Nov 29 IST
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांची निवड
02:08 PM, Nov 29 IST
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
02:08 PM, Nov 29 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल, मंत्रालयात ठाकरेंचं जोरदार स्वागत
01:50 PM, Nov 29 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज
01:50 PM, Nov 29 IST
मंत्रालयात उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा
01:49 PM, Nov 29 IST
उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात दाखल
01:26 PM, Nov 29 IST
विधानसभा अध्यक्ष पद राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती
01:26 PM, Nov 29 IST
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता
01:20 PM, Nov 29 IST
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते जयंत पाटील व कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल
01:15 PM, Nov 29 IST
मातोश्रीवरून उद्धव ठाकरे मंत्रालयाकडे रवाना
12:59 PM, Nov 29 IST
अजित पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल
12:58 PM, Nov 29 IST
मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याचा पदभार स्वीकारणार
12:57 PM, Nov 29 IST
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघणार
12:57 PM, Nov 29 IST
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार
07:08 PM, Nov 28 IST
आरे कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला हजेरी

'आरे बचाव'च्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी


07:01 PM, Nov 28 IST
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरेंची हजेरी


06:57 PM, Nov 28 IST
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा