Advertisement

राज ठाकरेंचं भोंग्यावरून अल्टीमेटम - Live Updates

SHARE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. पोलिस विभागानं मनसे कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवण्यास सुरुवात केली. मशिदींवरील भोंग्यांच्या वादात मनसे आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. या कार्यक्रमाशी संबंधित सर्व बातम्या मिळविण्यासाठी मुंबई लाइव्ह पाहत राहा...

LIVE UPDATES

01:16 PM, May 04 IST
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १३५ मशिदींवर पोलिस काय कारवाई करणार? - राज ठाकरे
01:15 PM, May 04 IST
अनधिकृत मशिदींना भोंग्याची परवानगी मिळाली तर हनुमान चालिसा वाजणार - राज ठाकरे

"हा विषय एक दिवसाचा नाही"

"जे मौलवी ऐकणार नाहीत त्यांना पुन्हा एकदा सांगतो की, भोंग्याविरोधातील आंदोलन सुरूच राहणार"

"भोंगे उतरवत नाही तोपर्यंत हनुमान चालिसा चालू राहणार"

"हा सामाजिक विषय धार्मिक विषय नाही"

"कुणी धार्मिक वळण दिल्यास आम्ही पण तसंच वळण देऊ"

"महाराष्ट्रात आमचा दंगली घडवण्याचा प्रयत्न नाही"

"सरकार आणि पोलिसांनी हे समजून घ्यावं"

"आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड का केली जातेय?"


01:07 PM, May 04 IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पहा लाईव्ह


01:07 PM, May 04 IST
भोंगे न लावणाऱ्या मौलवींचे राज ठाकरेंनी मानले आभार

"आज ९० टक्के ठिकाणी अजान झाल्या नाहीत"



01:06 PM, May 04 IST
फक्त आमच्यावरच कारवाई का होत आहे? - राज ठाकरे
01:05 PM, May 04 IST
मनसैनिकांना पोलिस नोटीस पाठवत आहेत - राज ठाकरे
01:04 PM, May 04 IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

आत्ताचं काही सुचना देणंगरजेचं आहे

09:42 AM, May 04 IST
पोलीस आयुक्त संजय पांडेंकडून मुंबईतील विविध भागांची पहाणी

भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

09:40 AM, May 04 IST
चारकोप कांदिवली येथे आज ४ मे रोजी सकाळी अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी बिल्‍डींगच्या टेरेसवर स्पिकरवर हनुमान चालीसा लावली. पण पोलिसांनी हा व्हिडिओ जुना असल्याचं म्हटलं आहे.


09:40 AM, May 04 IST
नवी मुंबईत नेरुळ परिसरात मस्जिदीसमोर मनसैनिकांनी स्पीकरवर वाजवली हनुमान चालीसा


09:39 AM, May 04 IST
मुंबई लोकलमधील प्रवाशांनीसुद्धा प्रवासादरम्यान केलं हनुमान चालीसाचं पठण


04:16 PM, May 03 IST
घाटकोपरचे मनसे नेता महेंद्र भानूशालीला अटक

भानुशालींच्या कार्यालयातून भोंगे जप्त

Advertisement
04:06 PM, May 03 IST
87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात
04:01 PM, May 03 IST
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया

मनसेची जी सभा झाली

परवानगी देतानाच काही अटी घालुन परवागनी दिली होती

सर्व फुटेज पोलिस आयुक्तांनी तपासली आहे

त्यात काही अटींची नियमांच उल्लंघन झाल अशी खात्री झाली

त्या अनुशंघाने ही कारवाई झालेली आहे

जे त्या सभेत होते त्यांवर पण कारवाई अभिप्रेत आहे

कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहील अस करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे

पोलिसांनी अधिकार आहे

कायदा जो कोणी मोडत असेल तर पोलिस सतर्क आहेत

कायदा कोणाला हातात घेऊ देणार नाही

04:00 PM, May 03 IST
राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल, पोलीस नोटीस द्यायला घरी जाणार
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा