Advertisement

Mumbai Rains <br/> Live Updates

SHARE

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईसहित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ६ तासांत धुवांधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील पाऊस, लोकल ट्रेन सेवा, वाहतूककोंडी, पाणी तुंबण्यासंदर्भातील सर्व "लाइव्ह" अपडेट्स येथे मिळवा.।

LIVE UPDATES

10:12 PM, Dec 05 IST
अनुयायांनी घेतला दादर स्टेशनचा आसरा

वादळ असो किंवा वारा मुंबईकर प्रत्येक परिस्थितीला नेहमीच तोंड देत असतात. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांनी दादर स्टेशनचा आसरा घेतला आहे.


09:48 PM, Dec 05 IST
ओखी वादळ मुंबईच्या २०० किमी अंतरावर असून मुंबईची परिस्थिती आणखी चिघळणार.
08:56 PM, Dec 05 IST
अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओंकडे दुर्लक्ष करा

हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील असल्याची अफवा पसरली होती. पण हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील नसून अशा व्हिडिओकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

08:49 PM, Dec 05 IST
मच्छिमारांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन

मच्छिमारांनी ४ आणि ५ डिसेंबर रोजी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. 

08:21 PM, Dec 05 IST
समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळल्या

मंगळवारी दुपारी १२.४३ वाजता ४.३५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या 

08:14 PM, Dec 05 IST
या गोष्टींची घ्या काळजी


07:58 PM, Dec 05 IST
चैत्यभूमीला जाणारे सहा रस्ते बंद

6 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने अनुयायी शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. पण ओखी वादळामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडला. यामुळे दादर येथे खोळंबा झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चैत्यभूमीला जाणारे सहा रस्ते बंद करण्यात आले आहेत.

07:57 PM, Dec 05 IST
रात्री ९ वाजता ओखी वादळ मुंबईच्या समुद्रकिनाऱ्या जवळून जाईल

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री ९ वाजता ओखी वादळ मुंबईच्या समुद्रकिनाऱ्या जवळून जाईल. 

07:42 PM, Dec 05 IST
७ डिसेंबरपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल

येत्या सात डिसेंबरपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन पालिका आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे .

07:04 PM, Dec 05 IST
पावसाचा जोर वाढणार

सोमवारी संध्याकाळपासून पडत असलेल्या पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या नंतर मुंबईत आणखी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.   

06:31 PM, Dec 05 IST
रेल्वे वाहतूक उशिरा

ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. जराही विश्रांती नघेता मंगळवारी सकाळी देखील पावसाने हजेरी लावली. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २९ मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १२ मिनिटे उशिरा सुरू आहे.

06:29 PM, Dec 05 IST
सतर्कतेचा इशारा

या वादळाचा प्रभावामुळे मुंबईच्या वातावरणात बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

06:26 PM, Dec 05 IST
हवाई वाहतूक उशिरा

ओखी चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही दिसून आला. विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे. 

06:23 PM, Dec 05 IST
वरळी सी लिंक वाहतुकीस खुला

ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. या चक्रीवादळामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

06:20 PM, Dec 05 IST
ओखी चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. येत्या २४ तासांत आणखी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यभरात ओखी चक्रीवादळाचा परिणाम सोमवारी संध्याकाळपासूनच जाणवू लागला होता.

04:36 PM, Dec 05 IST
अनुयायांनी घेतला दादर स्टेशनचा आसरा

वादळ असो किंवा वारा मुंबईकर कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला नेहमीच तयार असतात. ६ डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनामित्ताने मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांनी दादर स्टेशनचा आसरा घेतला आहे. ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा