Advertisement

'असा' आहे शशांकचा ‘३१ दिवस’


'असा' आहे शशांकचा ‘३१ दिवस’
SHARES

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेद्वारे लोकप्रिय झालेला अभिनेता शशांक केतकर लवकरच मोठ्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत झळकणार आहे. अमोल शेटगे दिग्दर्शित ‘वन वे टिकीट’ या मराठी सिनेमाद्वारे शशांकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यापूर्वी ‘कालाय तस्मै नम:’, ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘इथेच टाका तंबू’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांद्वारे तो घराघरात पोहोचला. आता ‘३१ दिवस’ असं काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या सिनेमात शशांकने मुख्य भूमिका साकारली आहे.


स्वप्नांचा पाठलाग 

रोल... कॅमेरा... अॅक्शन... असं म्हणताना आपण अनेक दिग्दर्शकांना पाहिलं असेल.  मात्र ‘३१ दिवस’ या सिनेमात प्रमुख भूमिका वठवणारा शशांकदेखील आपल्या वेगळ्या अंदाजात हाच डायलॉग बोलताना दिसणार आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा, स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची कथा या सिनेमाचा गाभा आहे.

फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी. एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित हा सिनेमा २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शशांकच्या जोडीला मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.हेही वाचा -

‘ये रे ये रे पैसा’ चा सिक्वेल येणार

बिग बॅासमध्ये ‘हेल्दी स्माइल’ स्पर्धा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा