Advertisement

बिग बॅासमध्ये ‘हेल्दी स्माइल’ स्पर्धा


बिग बॅासमध्ये ‘हेल्दी स्माइल’ स्पर्धा
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बुधवारीसुद्धा ‘फ्रीझ-रीलीझ’ हे साप्ताहिक कार्य रंगलं. या कार्याअंतर्गत मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना ‘बिग बॉस’तर्फे एक सरप्राईझ देण्यात आलं. शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला, तर भूषणच्या बायकोने भूषणला मार्गदर्शन केलं आणि त्यांची हिंमतही वाढवली.

भूषणच्या बायकोने रेशमचं आभार मानलं. कारण ती भूषणच्यामागे मोठ्या बहिणीसारखी उभी आहे. यासोबतच इतर सदस्यांना हे देखील सांगितलं की, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहायला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी अाल्या. मेघाच्या मुलीने मेघा आणि सईला एक निरोप देखील दिला.


तीन टीममध्ये विभागणी 

गुरूवारी ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांसाठी “हेल्थी स्माईल” स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. याअंतर्गत सदस्यांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात येईल,  टीम ए - दात, टीम बी - डाबर रेड पेस्ट आणि टीम सी - कॅव्हिटी असणार आहेत. टीम ए ला म्हणेच दातांना टीम सी मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटीपासून वाचविण्याची टीम बी ची जबाबदारी असणार आहे. या टास्कमध्ये कोणती टीम विजयी होते ते पहायचं आहे.हेही वाचा -

संहिता अन् भव्यतेचा संगम घडवा : राज ठाकरे

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा