Advertisement

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या


राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या
SHARES

बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राजेश श्रृंगारपुरे अाता गोट्या खेळणार अाहे. कदाचीत काम नसल्यामुळं असं उपहासात्मक म्हणलं जात असेल असं तुम्हाला वाटेल. पण असं नाही हा. तो खरंच गोट्या खेळण्यात गुंतणार अाहे.

 गोट्या’ या सिनेमात शाळेतील मुलांना गोट्या कशा खेळायच्या ते राजेश शिकवणार आहे. तो पुन्हा एकदा कोचच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान पाचोरे यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या ‘गोट्या’ या सिनेमात शाळेतील मुलांना गोट्या खेळायला शिकवण्याची जबाबदारी राजेशवर सोपावली आहे.


यापूर्वीही कोच

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक संग्रामसिंग गायकवाड यांच्या ‘मन्या - द वंडर बॅाय’ या सिनेमात राजेशने धावपटू घडवणारा कोच साकारला होता. त्यानंतर आलेल्या ‘एकता - एक पॅावर’ या सिनेमात तो कबड्डीचा कोच बनला होता. ‘गोट्या’च्या निमित्ताने राजेश गोट्या खेळाचा कोच बनला आहे.


मुलांना शिकवणार गोट्यांचा डाव

कदाचित आजच्या पिढीतील मुलांना ठाऊक नसलेल्या गोट्यांचा खेळ कसा खेळायचा, ते राजेश ‘गोट्या’ या सिनेमात शिकवणार आहे. या सिनेमाची कथा जरी गोट्या नावाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली, तरी ती गोट्या या खेळाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली आहे.


एकाग्रता वाढवणारा खेळ

गोट्या खेळणं म्हणजे टाइमपास हा निव्वळ गैरसमज आहे. हा खेळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ करणारा आहे. एकाग्रता वाढवणारा हा खेळ आहे. गोट्या खेळण्यासाठी चपळ असणं गरजेचं असल्यानं हा खेळ शारीरिक हालचालींचा वेग वाढवणाराही आहे. दृष्टी तीक्ष्ण करण्याची शक्तीदेखील गोट्या या खेळात असल्याचं राजेश मानतो.


बालपणीच्या आठवणींना उजाळा

माझ्या पिढीतील सर्वांनीच बालपणी गोट्यांचा खेळ खेळला असल्याचं ‘मुंबई लाइव्ह’ला सांगत राजेश म्हणाला की, बालपणी मी देखील गोट्या खेळलो आहे. रंगीबेरंगी गोट्यांचा डाव मांडून त्यातील एखादी गोटी अचूक मारण ही एक कला होती. ती कला मला चांगलीच अवगत होती. माझ्याकडे दोन मोठे डबे भरून गोट्या होत्या. ‘गोट्या’ सिनेमात कोचची भूमिका साकारताना पुन्हा बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा मिळाल्याचंही राजेश म्हणाला.दिग्दर्शकांचा अचूक नेम

गोट्या या खेळावर सिनेमाही बनू शकतो हे मला कधीच वाटलं नव्हतं, पण सिनेमाचे दिग्दर्शक भगवान पाचोरे यांना स्वत:वर विश्वास होता. गोट्या या खेळावर पटकथा लिहिताना विविध राऊंड्सच्या माध्यमातून त्यांनी या खेळातील रोमांच वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सिनेमा करताना एक वेगळाच अनुभव आला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळ

खरं तर आपल्याकडे गोट्या खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं या अर्थाने म्हटलं जातं. पण या खेळाची व्याप्ती जागतिक पातळीवर आहे. मार्बल कॅाम्पिटिशन्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर या खेळाचं आयोजन केलं जातं. त्याचाच आधार घेऊन या सिनेमाची कथा रचण्यात आली आहे.हेही वाचा -

बिग बाॅस : पुष्कर, भूषण, मेघा होणार भावूक !

सागर देशमुख साकारणार पुलंसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा