हृता दुर्गुळेने दिव्यांगांसोबत साजरा केला बालदिन!


SHARE

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अशा या गोड दिवशी पालक किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांसाठी विशेष भेटवस्तू आणतात. बालदिन हा प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या परीने साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागे मुलांचे चेह-यावरील फुलणारे हास्य हा एकमेव उद्देश असतो. 

बालदिन या दिवसाचा आनंद सर्वांना मिळाला पाहिजे हाच उद्देश मनाशी ठेवून अभिनेत्री हृता दुर्गुळेने यंदाचा बालदिन आदित्य प्रतिष्ठान, ठाणे संचलित दिव्यांग कला केंद्र येथील विद्यार्थांसोबत साजरा केला. दिव्यांग कला केंद्र येथे मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. या उत्कृष्ट कामाचे कौतुक करण्यासाठी आणि मुलांमधील आत्मविश्वास आणखी वाढविण्यासाठी हृताने बालदिनाच्या निमित्ताने या शाळेला भेट देण्याचे ठरविले.प्रत्येक व्यक्तीला कोणतेही काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच हृताने दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थांना कलेशी निगडीत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थांनी हृताला छानसे सरप्राईजही दिले!या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली आणि सर्व विद्यार्थांनी हृताचे स्वागत केले. या कार्यक्रमात विद्यार्थांनी एकापेक्षा एक उत्तम सादरीकरण करुन हृताकडून शाबासकीची थाप मिळवली. सादरीकरणासोबत विद्यार्थांमधील निरागसपणा आणि हृताचा मनमोकळा अन् हसमुख स्वभाव यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली.अशा प्रकारे आनंदमयी वातावरणात हृताने ठरवल्याप्रमाणे बालदिनाचे सेलिब्रेशन सुंदररीत्या पार पडले.हेही वाचा

पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!


संबंधित विषय