• पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!
  • पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!
  • पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!
  • पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!
  • पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!
SHARE

अवघ्या पाच वर्षांचा चिमुकला... 'छोटा पॅकेट बडा धमाका'...या चिमुकल्याला पाहून तुमच्या तोंडी हेच शब्द येतील! बिनधास्त तो सायकलवर असे स्टंट करतो. भलेभले त्याच्यापुढे पानी कम चाय वाटतात. अनेकदा स्टंट करताना तो पडतो. पण न डगमगता पुन्हा उठतो आणि त्याच जोमानं तो स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. अली सय्यद असं या चिमुकल्याचं नाव आहे.मूर्ती लहान, किर्ती महान

या छोट्या उस्तादानं आता नॅशनल लेवलपर्यंत मजल मारली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या नॅशनल लेवलच्या बीएमएक्स रायडिंग स्पर्धेत अली देखील सहभागी होणार आहे. मालाडमधल्या इनऑरबिट मॉल इथं १७ ते १९ नोव्हेंबरला होणाऱ्या स्पर्धेत अलीचाही सहभाग आहे. या स्पर्धेत बाजी मारणं हे अलीचं स्वप्न आहे. पण २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक हे अलीचं दुसरं स्वप्न आहे. विशेष म्हणजे नॅशनल लेवल स्पर्धेत सहभागी होणारा अली हा पहिलाच इतका छोटा रायडर आहे!सध्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेवर मी लक्ष केंद्रीत केलं आहे. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्यासाठी मी आत्तापासून मेहेनत घेत आहे. टोकियोमध्ये झेब्रो नावाचा बीएमएक्स रायडर आहे. २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये मला त्याला हरवायचं आहे.

अली सय्यद, खेळाडू, बीएमएक्स रायडरबीएमएक्सच त्याचा खेळ आणि पॅशन!

अली सध्या पहिल्या इयत्तेत असून तो त्याचं पॅशन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो. सकाळ संध्याकाळ २-२ तास अली सराव करतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करतो. त्यानंतर दुपारी शाळेत जातो. शाळेतून येऊन तो संध्याकाळी सरावासाठी बीकेसीच्या सिटी पार्कमध्ये जातो. दोन तास सराव केल्यानंतर अली घरी जाऊन पुन्हा अभ्यास करतो. 


अली चार वर्षांचा असल्यापासून सायकलिंग करत आहे. अली सुरुवातीला युट्यूबवर बीएमएक्स रायडिगचे व्हिडिओ पाहायचा. अलीची आवड पाहून मी अलीला कोच लावला. स्टंट्स कसे करायचे? त्याच्या काय ट्रिक्स आहेत? याचे प्रशिक्षण कोचकडून दिले जाते. व्यायाम, सराव यासोबतच अलीच्या खाण्या-पिण्यावरही लक्ष ठेवलं जातं.

वासिम सय्यद, अलीचे वडीलविशेष म्हणजे 'अली वनवे' या नावानं त्याला ओळखलं जातं! अनेक सेलिब्रिटींनी अलीला पाठिंबा दिला आहे. बिग बॉस विजेता प्रिन्स नरूला, रणवीर जे अशा अनेक सेलिब्रिटिंनी त्याला पाठिंबा दिला आहे. तुम्हाला जर अलीचे व्हिडिओ पहायचे असतील तर तुम्ही https://www.instagram.com/ali_oneway/ या लिंकवर क्लिक करू शकता. खरंतर बीएमएक्स रायडिंग या खेळाला भारतात जास्त प्रसिद्धी नाही. पण या खेळात अलीनं घेतलेली रूची ही नक्कीच इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल.

हेही वाचा

'तिनं' भल्याभल्यांनाही विचार करायला लावलंय!

ऑक्सफर्ड डिक्शनरीतही आता चमचा, दादागिरी आणि जुगाड!


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ