Advertisement

वर्षा उसगांवकर प्रथमच कोंकणी चित्रपटात

वर्षा उसगावकर यांची मातृभाषा कोंकणी असूनही त्या आजवर कधीही कोंकणी चित्रपटात दिसल्या नव्हत्या. पण आता प्रथमच त्या ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

वर्षा उसगांवकर प्रथमच कोंकणी चित्रपटात
SHARES

काही कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रादेशिक चित्रपटसृष्टीपासून थेट बॉलीवूडपर्यंत आपला दबदबा निर्माण करतात. पण त्यांना मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी कधीच मिळत नाही. अभिनेत्री वर्षा उसगांवकरांच्या बाबतही असंच काहीसं घडलं आहे. वर्षा उसगावकर यांची मातृभाषा कोंकणी असूनही त्या आजवर कधीही कोंकणी चित्रपटात दिसल्या नव्हत्या. पण आता प्रथमच त्या ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.


'या' चित्रपटात केलं काम

वर्षा उसगांवकर यांनी आजवर मराठी, हिंदी तसंच राजस्थानी चित्रपटात अभिनय केला आहे. मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना कोंकणी चित्रपटात आणण्याची कल्पना लेखक-दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस यांची होती. ९० च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर वर्षा उसगांवकर यांनी राज्य केलं. उत्कृष्ठ अभिनयाबरोबरच त्या सुंदर नृत्यांगनाही आहेत.


माझी मातृभाषा असलेल्या ‘जांवय नं. १’ या चित्रपटात दिग्गज गोवन कलाकारांसोबत काम करताना मला खूप मजा आली. पैसा वसूल धमाल कॉमेडी असणारा ‘जांवय नं. १’ हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल. असा मला विश्वास वाटतो.
- वर्षा उसगांवकर, अभिनेत्री

या चित्रपटात सासू आणि जावई यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी वर्षा उसगांवकर यांचा लुकही बदलण्यात आला आहे. या चित्रपटात वर्षा उसगांवकर यांच्यासोबत जोशिता रोड्रीक्स (मिस साऊथ एशिया टीन), रंजीथा ल्युईस, दिपक पलाडका या गोवन कलाकारांच्या भूमिका आहेत. केविन डिमेलो हे या चित्रपटात जावयाच्या भूमिकेत दिसतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा