Advertisement

फिल्म रिव्ह्यू - 'भय'ग्रस्त जाहले प्रेक्षक!

पहिल्याप्रथम चित्रपटाचा विषय अतिशय उत्तम आहे. एक चांगला प्लॉटही त्यानुसार दिग्दर्शकाला उपलब्ध झाला. मात्र, त्याला न्याय देण्यात मात्र पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न करणाऱ्या राहुल भातणकर यांना मात्र पुरेसं यश आल्याचं दिसत नाही. स्किझोफ्रेनियावर असलेल्या चित्रपटात अचानकच घुसलेल्या राजकारण आणि अंडरवर्ल्डमुळे कथेच्या प्लॉटची मोडतोड झाल्यासारखं वाटतं. शिवाय, या दोन घुसखोरांमुळे मुख्य विषय असलेला गोकुळचा आजार आणि त्यावरचा उपाय हे विषय दिग्दर्शकाला अगदी शेवटच्या ५ मिनिटांत गुंडाळावे लागले.

फिल्म रिव्ह्यू - 'भय'ग्रस्त जाहले प्रेक्षक!
SHARES

१९९९ साली आलेला 'रात्रआरंभ' आणि २००४ साली आलेला 'देवराई' या दोन्ही सिनेमांनी स्किझोफ्रेनिया या आजारावर दमदार कथा आणि तगड्या अभिनय-दिग्दर्शनावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हेच आव्हान आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नात राहुल भातणकर यांनी पेलायचा प्रयत्न केला. चित्रपटाच्या सुरुवातीला या प्रयत्नाबद्दल उत्सुक असलेला प्रेक्षक शेवटाकडे येता येता अपेक्षाभंग झाल्यामुळे वैतागतो.

गोकुळ जोशी (अभिजीत खांडकेकर) आणि मीरा जोशी (स्मिता गोंदकर) या दोघांची ही कथा. गोकुळला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया हा आजार आसतो. गोकुळला त्याच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. गोकुळचा हा आजार आणि त्यातून रोज पत्नी मीराशी होणारं भांडण, मीराला गोकुळच्या अशा वागण्याचा होणारा त्रास आणि या सगळ्यातून चित्रपटात घडणाऱ्या नवनवीन अनपेक्षित(अनाकलनीय!) गोष्टी..असा एकंदर चित्रपटाचा विषय.

पहिल्याप्रथम चित्रपटाचा विषय अतिशय उत्तम आहे. एक चांगला प्लॉटही त्यानुसार दिग्दर्शकाला उपलब्ध झाला. मात्र, त्याला न्याय देण्यात मात्र पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न करणाऱ्या राहुल भातणकर यांना मात्र पुरेसं यश आल्याचं दिसत नाही. स्किझोफ्रेनियावर असलेल्या चित्रपटात अचानकच घुसलेल्या राजकारण आणि अंडरवर्ल्डमुळे कथेच्या प्लॉटची मोडतोड झाल्यासारखं वाटतं. शिवाय, या दोन घुसखोरांमुळे मुख्य विषय असलेला गोकुळचा आजार आणि त्यावरचा उपाय हे विषय दिग्दर्शकाला अगदी शेवटच्या ५ मिनिटांत गुंडाळावे लागले.

भयपटाचं संगीत तर चित्रपटाच्या कथानकापेक्षाही भरकटलंय. कर्णकर्कश्श्य आणि असंबद्ध संगीतामुळे प्रेक्षक सिनेमाशी एकरूप होतच नाही. काही गाणी इथे का आहेत? असाच प्रश्न प्रेक्षकांना पडतो. गाण्यांचं आणि अनेक दृश्यांचं संगीत हे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याऐवजी खिदळून हसायला भाग पाडतं. रोमॅण्टिक गाण्यांबद्दल तर न बोललेलंच बरं. भारतात असलेले हिरो-हिरोईन गाणी सुरू झाल्यावर अचानकच दुबईत कसे पोहोचतात? आणि गाणं संपताच लगेच भारतात कसे प्रकट होतात? हे प्रश्न प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहात नाहीत.

त्यातल्या त्यात चित्रपटाचा प्लस पॉईंट म्हणजे अभिजीत खांडकेकर. अभिजीतने संपूर्ण चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. त्याला पाहिलं, की स्किझोफ्रेनिया झालेला गोकुळ असाच असला पाहिजे याची प्रेक्षकांना खात्री पटते. मात्र त्याला साथ देणारी मीरा अर्थात स्मिता गोंदकरने मात्र प्रेक्षकांची साफ निराशा केली. तिच्याऐवजी अभिजीतच्या तोडीची एखादी अभिनेत्री असायला हवी होती असं वाटत राहातं. शिवाय, संस्कृती बालगुडे, प्रफुल्ल कुलकर्णी, उदय टिकेकर, सतीश राजवाडे असे जबरदस्त अभिनेते असतानाही त्यांच्या अभिनयाचा पुरेसा वापर झालेला नाही.

एकूणातच काय, तर सुमार दिग्दर्शन, प्लॉटची मोडतोड, कर्णकर्कश्श्य संगीत, अचानक उगवलेली गाणी आणि शेवटी अपेक्षाभंग...हे सगळं पाहायची तयारी असेल, तरच 'भय'चं तिकीट काढून थिएटरमध्ये पाऊल ठेवा...नाहीतर तुम्हीच 'भय'ग्रस्त होण्याची शक्यता अधिक आहे!

Movie - Bhay

Cast - Abhijit Khandkekar, Smita Gondkar, Satish Rajwade, Uday Tikekar

Ratings - 1.5/5

हेही वाचा

माधुरीच्या मराठी चित्रपटाचं नाव ठरलं हो!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा