Advertisement

‘लव्ह-लफडे’ मोबाईल अॅपद्वारे प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट


‘लव्ह-लफडे’ मोबाईल अॅपद्वारे प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट
SHARES

मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसेंदिवस अधिकच उंचावत आहे. या चित्रपटांचे विषयही नाविन्यपूर्ण असतात. पण हे विषय समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वेळ आणि पैसा. तत्रंज्ञानाच्या युगात प्रत्येक जण हा आपआपल्या कामात व्यस्त असतो अथवा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. कुटुंबाकरता मनोरंजनासाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईल अॅपद्वारेच प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न मराठी चित्रपट क्षेत्रात पहिलांदा होत आहे.


चित्रपटाचं प्रदर्शन एचसीसी नेटवर्क अॅपद्वारे

मराठी चित्रपट क्षेत्रात एचसीसी नेटवर्क अॅपद्वारे चित्रपट प्रदर्शित करणारं हे पहिलंच अॅप ठरणार आहे. अशा प्रकारे लवकरच एचसीसी नेटवर्क अॅपद्वारे प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ‘लव्ह-लफडे’.

प्रेम म्हटलं की प्रेमाच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी, गंमतीजमती घडतात त्याचं चित्रण म्हणजे ‘लव्ह-लफडे’. सचिन आंबात यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे दिसतील. तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते आणि कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा