माधुरी म्हणते 'होऊन जाऊ द्या'


  • माधुरी म्हणते 'होऊन जाऊ द्या'
  • माधुरी म्हणते 'होऊन जाऊ द्या'
  • माधुरी म्हणते 'होऊन जाऊ द्या'
SHARE

माधुरी दीक्षितचा आगामी मराठी चित्रपट बकेट लिस्टमधील होऊन जाऊ द्या हे पहिलं-वहिलं गाणं सोशल मीडियावर प्रसारीत झालं आहे. लाखो लोकांना आपल्या नृत्याने मोहून टाकणारी आपली मराठमोळी मोहिनी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा बकेट लिस्ट या चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट बरोबर नृत्याचा ठेका पकडत आपल्या सर्वांना नाचायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या मनातील एका गूढ कोपऱ्यात असलेल्या इच्छा आणि आकांक्षांना उजाळा देणारा चित्रपट म्हणजे बकेट लिस्ट. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येतील. होऊन जाऊ द्या! हे गाणं आपल्याला आयुष्य जगायला, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास प्रोत्साहित करते.

विशेष म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षितने या मराठी गाण्यावर नृत्याचा ताल धरलेला असून तिच्यासमवेत सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर या बकेट लिस्ट चित्रपटाच्या संपूर्ण टीमने तालात ताल मिसळलेला दिसून येतो आहे.

श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान या सुराधिशांच्या स्वरांनी सजलेलं होऊन जाऊ द्या! हे सूरमधुर गाणं रोहन-रोहन या संगीतकार जोड गोळीने संगीतबद्ध केलं आहे.

हा सिनेमा 25 मे ला प्रदर्शित होणार असून मराठमोळ्या गाण्यावर माधुरीने धरलेला नृत्याचा ताल सर्वांना घायाळ करेल यात किंचतीही शंका नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या