Advertisement

'रिव्हिजिट सिनेमा' या वेब शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

'रिव्हिजिट सिनेमा' या वेब शोच्या यशामागे या वेब शोचा अँकर कपिल रेडेकरचा महत्वाचा वाटा आहे.

'रिव्हिजिट सिनेमा' या वेब शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
SHARES

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात बराचसा प्रेक्षक वर्ग ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीज तर अगदी जागतिक चित्रपटांकडेही वळला. अशावेळी आपला प्रेक्षकवर्ग मराठी दर्जेदार चित्रपटांकडे कसा वळेल या अनुषंगाने 'रॉ फिल्म्स'तर्फे तेजस साठे, मयुरेश भोर आणि टीम यांचा 'रिव्हिजिट सिनेमा' हा वेब शो सिनेप्रेमींकरिता एक पर्वणीच ठरला.

आशयघन आणि चौकटी बाहेरचे विषय घेऊन या वेब शो मार्फत आजतागायत चार चित्रपटांच्या प्रवासाची नव्यानं ओळख करून दिली. प्रेक्षकांचा भरभरून असा प्रतिसाद 'रिव्हिजिट सिनेमा' मार्फत प्रसारित केलेल्या सर्वच चित्रपटांना मिळाला. नुकत्याच झालेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' या चित्रपटाच्या प्रवासानं तर एक नवा कोरा विषय प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला.

अगदी प्रेक्षकही दिग्दर्शकांच्या नजरेतून या चित्रपटांना नव्यानं पाहू लागले. 'धुडगूस', 'रेगे', 'टिंग्या' आणि 'न्यूड' या चार चित्रपटांना 'रिव्हिजिट सिनेमा' या वेब शो मार्फत प्रेक्षकांपर्यंत रिव्हिजिट करण्यात उत्तम यश मिळालं असून प्रेक्षकांचाही दर्जेदार प्रतिसाद मिळाला आहे.

'रिव्हिजिट सिनेमा' या वेब शोच्या यशामागे या वेब शोचा अँकर कपिल रेडेकरचा महत्वाचा वाटा आहे. या वेब शोमध्ये कपिलचे सादरीकरण अर्थात वाखाणण्याजोगे आहे. खरंच कपिलचं सादरीकरण कौशल्य आणि या वेब शोनं निवडलेल्या कंटेंटची बांधणी प्रेक्षकांना लुभावणारी आहे.



हेही वाचा

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा