Advertisement

'असेही एकादा व्हावे'साठी उमेश-प्रियाने घेतले अभिनयाचे धडे!


'असेही एकादा व्हावे'साठी उमेश-प्रियाने घेतले अभिनयाचे धडे!
SHARES

कलाकार कितीही मोठे असले, तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी वेळप्रसंगी हे कलाकार वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सुद्धा अलिकडेच काही वर्कशॉप जॉइन केले होते. 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात उमेश आणि तेजश्री या दोघांची भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे त्यांनी या वर्कशॉपचा आधार घेतला होता.



चित्रपटात मस्त गाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यातल्या ‘यू नो व्हॉट?’ या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात उमेशने पहिल्यांदाच गिटार वाजवली आहे. त्याने गिटारचे प्रशिक्षण अद्वैत पटवर्धनकडून घेतले आहे.

तेजश्री प्रधान या सिनेमात एक आर. जे. ची भूमिका साकारते आहे. यासाठी तिनेसुध्दा खूप मेहनत घेतली आहे. तिने आर.जे.चे खास एक महिना प्रशिक्षण घेतले. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा संवाद, शब्दोच्चार, हजरजबाबीपणा आणि मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्रीने जवळून पाहिल्या. तिने एका रेडिओ स्टेशनला भेटदेखील दिली होती. आर. जे. किरणच्या व्यक्तिरेखेत चोख बसण्यासाठी तिने आर. जे. च्या कामाचे निरीक्षण करत त्यांच्याशी संवाद साधून काही टिप्सही घेतल्या.

उमेश-तेजश्रीने यापूर्वी 'लग्न पहावे करून' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. मात्र, त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री दाखवणारा 'असेही एकदा व्हावे' हा पहिलाच सिनेमा आहे. मात्र, उन्हाळी सुट्टीत प्रेमाचा थंडावा घेऊन येणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरेल, हे नक्की.


हेही वाचा

उमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा