Advertisement

मैत्रीवर आधारित ‘दोस्तीगिरी’


मैत्रीवर आधारित ‘दोस्तीगिरी’
SHARES

खरी मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ असते. शाळा आणि कॅलेजातली मैत्री सर्वांसाठीच स्पेशल असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवतात. या सुंदर नात्यावरचा 'दोस्तीगिरी' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकरपुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. अरिहंत मूव्हीज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मूव्हीज क्रिएशन्स निर्मित ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर यांनी लिहिले आहेत. २४ आॅगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटासंदर्भात सांगताना निर्माते संतोष पानकर म्हणाले की, मनोज वाडकर जेव्हा चित्रपाटाची कथा घेऊन आले, तेव्हा कथा-पटकथा ऐकता क्षणीच चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं. चित्रपटाचं कथानक मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणारं असल्यानं ‘दोस्तीगिरी’ आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसाच्या सुमारास रिलीज करायचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

लेखक मनोज वाडकर या सिनेमाबाबत म्हणाले की, कॉलेज विश्व आणि त्या दिवसांतली बहरणारी मैत्री यावर ‘दोस्तीगिरी’ हा सिनेमा आहे. या कथेतली पाच मित्र-मैत्रिणींची ‘दोस्तीगिरी’ प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयीन जीवनात जगलो असल्याची जाणीव हा सिनेमा पाहताना सर्वांनाच होईल. माझ्या महाविद्यालयीन जीवनातले काही प्रसंग मी या सिनेमात चितारले आहेत.”


हेही वाचा

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या


संबंधित विषय
Advertisement