Advertisement

या दोघींचा 'आम्ही दोघी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


या दोघींचा 'आम्ही दोघी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

२०१८ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच रिलीज झालेल्या 'आपला मानूस' या रहस्यपटानंतर आता 'आम्ही दोघी' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गौरी देशपांडे यांच्या कथेवर आम्ही दोघी या चित्रपटाची कथा आधारीत आहे. गौरी देशपांडे यांच्या कथेला योग्य न्याय दिला आहे तो अभिनेत्री, लेखिका आणि आता या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शिकेची भूमिका निभावणाऱ्या प्रतिमा जोशी हीने.


काय आहे कथा?

या चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरते आहे. या दोघींची विचारसरणी वेगळी असली तरी त्याचे अनेक गोष्टी एकमेकींशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात. मुक्ता बर्वे सकारात असलेली व्यक्तीरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका गृहिणीची आहे. तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही. प्रिया बापट ही एक थोडी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारते आहे. त्यातून तीच्या वयाचे तीन टप्पे आपल्याला दिसतील.

आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात. त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. ही आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची आणि म्हणूनच त्यांना प्रिय असलेली गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप-मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला आहे. हा विषय प्रत्येक तरुणीशी भावनात्मकरित्या जोडला जाणारा आहे. म्हणूनच प्रेक्षक त्याबाबत संवेदनशीलरित्या जोडला जाईल. मी फार पूर्वीच ठरवले होतं की जेव्हा केव्हा मी चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल.
- प्रतिमा जोशी, दिग्दर्शिका

मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन कसलेल्या अभिनेत्रींबरोबर किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबालकर आणि प्रसाद बर्वे यांच्या भूमिका आहेत. प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिलं आहे. या चित्रपटात केवळ एकच गाणं आहे. ‘कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे...,’ हे गाणे गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे आणि त्याची रचना मंगेश धाकडे यांनी केली आहे. वैशाली माडे यांनी हे गाणं गायलं आहे. ‘आम्ही दोघी’ची निर्मिती आणि सादरीकरण एव्हरेस्ट एनटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांचं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा