Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ हा आणखी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ हा आणखी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक शुभम रे यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’चं टायटल क्रिएटिव्ह सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक सटायर पहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला समाजाचा आरसा मानलं जातं. याच कारणामुळे रूपेरी पडद्यावर सादर होणाऱ्या चित्रपटांमध्येही समाजात घडणाऱ्या घडामोडींचं प्रतिबिंब उमटत असतं.

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रÌपटातही असाच एक प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे समाजव्यवस्था आणि जनतेची मानसिकता यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिग्दर्शक शुभम यांचं म्हणणं आहे. हे एक सामाजिक सटायर असल्यानं प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक स्तरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या कथेशी एकरूप होईल.

चित्रपटात प्रकाश भागवत, प्रिया गमरे, संजीवनी जाधव, विराग जाखड, डॉ. विलास उजवणे, रंगराव घागरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कॅमेरामन निखील कांबळे यांनी या सिनेमाची सिनमॅटोग्राफी केली असून कला दिग्दर्शन विराग जाखड यांनी केलं आहे.

संगीतकार समीर सोनू यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे, तर मेकअप-हेअर डिझाइनचं काम हेमंत पालकर यांनी केलं आहे. अश्विनी चंद्रिकापूरे यांनी या चित्रपटातील गाण्यांची नेत्रदीपक कोरिओग्राफी केली असून, राणी वानखेडे यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा